फिल्मोत्सवात रंगला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:45 IST2021-02-05T05:45:30+5:302021-02-05T05:45:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : राज्य शासनाकडून पुरस्कार प्राप्त झालेल्या वनवास या लघुपटासह ७ लघुपटांचा फिल्मोत्सव रविवारी कालिदास कलामंदिरात ...

फिल्मोत्सवात रंगला
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : राज्य शासनाकडून पुरस्कार प्राप्त झालेल्या वनवास या लघुपटासह ७ लघुपटांचा फिल्मोत्सव रविवारी कालिदास कलामंदिरात रंगला. मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या हस्ते या महोत्सवाचा प्रारंभ झाल्यानंतर त्यांनी ब्ल्यू हिल प्रॉडक्शन संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
या सोहळ्याप्रसंगी राजेभोसले यांच्यासमवेत संस्थेचे अध्यक्ष नीलेश आंबेडकर, समीक्षक वैभव छाया, उद्योजिका पद्मजा राजगुरु उपस्थित होते. देश-विदेशात ६५ पुरस्कार मिळविलेल्या वनवास या कलाकृतीला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. त्याशिवाय लॉकडाऊन इन भीमनगर, अल्फाज, झगा, १०८ या लघुपटांनादेखील प्रेक्षकांनी दाद दिली. यावेळी अविनाश जुमडे लिखित जीवनगाणे या व्हिडीओ अल्बमचा प्रिमीअर तसेच राहुल सोनवणे संपादित फिल्मोत्सव- २०२१ या विशेषांकाचे प्रकाशन तसेच प्रॉडक्शनअंतर्गत कार्य करणाऱ्या कलाकारांचा गौरवदेखील करण्यात आला.
फोटो ३१ पीएचजेएन ७७
फिल्मोत्सवाचा दीपप्रज्वलनाद्वारे उद्घाटन करताना मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले. समवेत संस्थेचे अध्यक्ष नीलेश आंबेडकर, समीक्षक वैभव छाया, उद्योजिका पद्मजा राजगुरु, अविनाश जुमडे आदी.