नाशिक : सर्वत्र रंग, रहाडी, रेन डान्स आणि रंगाची उधळण करीत आज नाशिकमध्ये मोठ्या जल्लोषात रंगपंचमी साजरी होत आहे. रहाडी म्हणजे एक प्रकारचे पेशवेकालीन हौद असून, त्यात धप्पा म्हणजे उड्या घेऊन रंगोत्सव साजरा केल जात आहे. मंत्री गिरीश महाजनदेखील यात सहभागी झाले असून, रोकडोबा मित्रमंडळाच्या रंगोत्सवात ढोल-ताशाच्या तालात त्यांनीही नृत्य केले.
सर्वत्र होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जात असली तरी नाशिकमध्ये मात्र होळीच्या पाचव्या दिवशी रगपंचमी साजरी करण्याची पेशवेकालीन परंपरा आहे. त्यानुसार अगोदरच गावठाण भागातील आठ रहाडी खोदून त्या स्वच्छ केल्या जातात आणि त्यात केवळ नसर्गिक फुलांपासून तयार केलेला रंगच वापरला जातो. प्रत्येक रहाडीला धार्मिक महत्व असून, कलर कोडदेखील आहेत.
मानकऱ्यांच्या हस्ते आज दुपारी सजवलेल्या रांगोळ्या काढलेल्या रहाडींची पुजा झाली आणि त्यानंतर त्यात उड्या घेण्यास सुरुवात झाली. रोकडोबा मंडळाच्या रंगपंचमीचे आयोजक भाजपत दाखल झालेले ज्येष्ठ नगरसेवक शाहू खैरे आयोजक असून, त्याठिकाणी जलसंपदा तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी रंगोत्सवात सहभाग घेतला. यात यावेळी महापौर हिमगौरी अडके, स्थायी समिती सभापती मच्छींद्र सानप, शाहू खैरे आदी सहभागी झाले होते.
Web Summary : Nashik joyously celebrated Rang Panchami with traditional fervor. Minister Girish Mahajan participated in the festivities, dancing to the rhythm of drums at the Rokdoba Mandal event. Nashik uniquely celebrates it five days after Holi, maintaining a Peshwa-era tradition with natural colors in specially prepared 'Rahadi' ponds.
Web Summary : नाशिक में रंग पंचमी पारंपरिक उत्साह के साथ मनाई गई। मंत्री गिरीश महाजन ने रोकडोबा मंडल के कार्यक्रम में ढोल-ताशे की थाप पर नृत्य किया। नाशिक में होली के पांच दिन बाद रंग पंचमी मनाने की अनूठी परंपरा है, जिसमें विशेष रूप से तैयार 'रहाडी' तालाबों में प्राकृतिक रंगों का उपयोग किया जाता है।