रंगारंग सोहळ्याने रंगला कला मंच महोत्सव

By Admin | Updated: May 9, 2014 23:43 IST2014-05-09T22:48:14+5:302014-05-09T23:43:29+5:30

नाशिक : प्रशिक्षणाबरोबरच कलावंतांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक उपक्रमाचे आयोजन करणार्‍या नाशिकमधील कला मंच या सामाजिक संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्ताने रंगारंग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कला मंच या महोत्सवात कलावंतांनी विविध प्रकारचे नृत्य सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढविली.

Rang Kalanga Kala Manor Festival Festival | रंगारंग सोहळ्याने रंगला कला मंच महोत्सव

रंगारंग सोहळ्याने रंगला कला मंच महोत्सव

नाशिक : प्रशिक्षणाबरोबरच कलावंतांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक उपक्रमाचे आयोजन करणार्‍या नाशिकमधील कला मंच या सामाजिक संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्ताने रंगारंग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कला मंच या महोत्सवात कलावंतांनी विविध प्रकारचे नृत्य सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढविली.
प. सा. नाट्यमंदिर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने झाली. अध्यक्षस्थानी स्वामिनारायण स्कूलच्या मुख्याध्यापक अस्मिता पाटील होत्या. यावेळी सिंधुसागर अकॅडमीच्या उपमुख्याध्यापक शारदा, जयकुमार खेले, श्रद्धा राजधर, नगरसेवक विशाल घोलप आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी ५ ते ५५ वर्षांपर्यंतच्या कलावंतांनी विविध प्रकारचे रंगारंग कार्यक्रम सादर केले. यावेळी त्यांनी इस्टर्न ॲण्ड वेस्टर्न डान्स, सोलो डान्स, ग्रुप डान्स, त्याचप्रमाणे महाराष्ट्राची लावणी आणि गोंधळी हे पारंपरिक नृत्य सादर केले. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते कलावंतांचा सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक लक्ष्मीकांत निकम यांनी, तर सूत्रसंचालन शलाका यांनी केले. राज अटक यांनी आभार मानले. पाहुण्यांचा सत्कार पंकज गांगुर्डे, सागर कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो स्कॅनला दिले आहेत.

Web Title: Rang Kalanga Kala Manor Festival Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.