राणेनगर : संशयिताकडून कट्टा जप्त; युनिट दोनची कारवाई दीड महिन्यांत २० गावठी कट्टे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 01:47 IST2018-05-19T01:47:01+5:302018-05-19T01:47:01+5:30

नाशिक : गत दीड महिन्यात शहर पोलिसांनी विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत २० गावठी कट्टे जप्त केली आहेत़

Ranenagar: Katta seized from suspect; Unit 2 action: Within one and a half months, 20 gravel pouches were seized | राणेनगर : संशयिताकडून कट्टा जप्त; युनिट दोनची कारवाई दीड महिन्यांत २० गावठी कट्टे जप्त

राणेनगर : संशयिताकडून कट्टा जप्त; युनिट दोनची कारवाई दीड महिन्यांत २० गावठी कट्टे जप्त

नाशिक : गत दीड महिन्यात शहर पोलिसांनी विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत २० गावठी कट्टे जप्त केली आहेत़ शहरात मोठ्या संख्येने अवैध कट्टे येत असल्याचे समोर आले असून, युनिट दोनने शुक्रवारी (दि़१८) दुपारी राणेनगर परिसरातून एका संशयितास गावठी कट्ट्यासह अटक केली़ संशयित जयेश ऊर्फ भोला सुरेश अहिरे असे या संशयिताचे नाव आहे़ गुन्हे शाखेच्य युनिट दोनचे पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांना राणेनगर परिसरात गावठी कट्टा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक रवींद्र सहारे, पोलीस हवालदार श्रीराम सपकाळ, पोलीस नाईक परमेश्वर दराडे, पोलीसशिपाई यादव डंबाळे, जयंत शिंदे यांनी दुपारी दोन वाजेच्या सुमारास भिकुबाई विद्यालयाजवळ सापळा रचून संययित जयेश अहिरे (२७, रा़ सद्गुरू अपार्टमेंट, उपनगर, गांधीनगर) यास ताब्यात घेतले़

Web Title: Ranenagar: Katta seized from suspect; Unit 2 action: Within one and a half months, 20 gravel pouches were seized

टॅग्स :Crimeगुन्हा