फार्म हाऊसमधील ‘रान’ पेटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:38 IST2021-02-05T05:38:37+5:302021-02-05T05:38:37+5:30
सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या राठी फार्म हाऊसच्या परिसरात असलेल्या रानातील गवताला दुपारी दीड वाजेच्या सुमारास आग लागली. सुरुवातीला आगीचे ...

फार्म हाऊसमधील ‘रान’ पेटले
सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या राठी फार्म हाऊसच्या परिसरात असलेल्या रानातील गवताला दुपारी दीड वाजेच्या सुमारास आग लागली. सुरुवातीला आगीचे स्वरूप कमी होते. त्यामुळे फार्महाऊसच्या कर्मचाऱ्यांनी झाडांच्या फांद्याच्या सहाय्याने झोडपणी करत पेटलेले गवत विझविण्यास सुरुवात केली; मात्र गवत वाळलेले आणि परिसरात वेगाने सुटलेला वारा यामुळे आगीने रुद्रावतार धारण केला. आगीचे स्वरूप वाढत असल्याचे लक्षात येताच अखिल राठी यांनी त्वरित अग्निशमन दलाला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच सातपूर उपकेंद्रावरील दोन बंबांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळ गाठले. पाण्याचा मारा करत फार्म हाऊसमधील मोठ्या मोकळ्या भूखंडावरील वाळलेल्या गवताला लागलेली आग विझविण्यास सुरुवात केली. आग मोठी असल्याने या जवानांच्या मदतीला सिडको व नाशिकरोड उपकेंद्रांवरील प्रत्येक एक बंबासह जवानांची अतिरिक्त कुमक पाठविण्यात आली. चार बंबांच्या सहाय्याने सुमारे दहा ते पंधरा जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आग विझविली.
या फार्म हाऊसच्या परिसरात मोठ्या प्रमाणात रानगवत उंचच उंच वाढलेले होते. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने खोडसाळपणा करत ज्वलनशील वस्तू फेकल्यामुळे फार्म हाऊसमध्ये वणवा पेटल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. सुदैवाने या आगीच्या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.
--
फोटो आर वर ३१सातपूर नावाने सेव्ह आहे.
===Photopath===
310121\31nsk_11_31012021_13.jpg
===Caption===
आग विझविताना कर्मचारी