Ramnath Kovind's husband arrives in Nashik | राष्टÑपती रामनाथ कोविंद यांचे नाशिकमध्ये आगमन

राष्टÑपती रामनाथ कोविंद यांचे बुधवारी सायंकाळी नाशिकच्या ओझर विमानतळावर सपत्निक आगमन झाले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांचे स्वागत केले. समवेत पालकमंत्री गिरीश महाजन.

ठळक मुद्देशहरात मुक्काम : आर्टिलरी येथे आज फ्लॅग प्रदान सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : राष्टÑपती रामनाथ कोविंद हे नाशिक दौऱ्यावर असून, बुधवारी सायंकाळी विशेष विमानाने त्यांचे ओझर विमानतळावर सपत्निक आगमन झाले. गुरुवारी (दि.१०) सकाळी ९ वाजता गांधीनगर आर्टिलरी एव्हीएशनमध्ये राष्टÑपतींच्या हस्ते फ्लॅग प्रदान हा मुख्य सोहळा होणार आहे.
आपल्या दोन दिवसांच्या दौºयात राष्टÑपती शासकीय विश्रामगृहात रात्री मुक्कामास असून, गुरुवारी सकाळी ९ वाजता आर्टिलरी सेंटर येथे फ्लॅग प्रदान सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत. सैन्य दलातील वैमानिक घडविण्याचे प्रशिक्षण देणारे आर्टिलरी कॅट हे देशातील सर्वात जुने आणि मोठे प्रशिक्षण केंद्र आहे. युद्धजन्य परिस्थितीत लढाऊ हेलिकॉप्टरच्या वैमानिकांचे प्रशिक्षण या केंद्रात दिले जाते. या केंद्रातील वैमानिकांनी देशातील अनेक युद्धात दिलेल्या योगदानाबद्दल या केंद्राला राष्टÑपतींच्या हस्ते विशिष्ट ध्वज प्रदान केला जाणार आहे. त्यानंतर येथूनच १० किलोमीटर अंतरावरील आर्टिलरी तोफ रेंज परिसरात उभारण्यात आलेल्या ‘रुद्रनाद’ संग्रहालयाचे उद्घाटन राष्टÑपती कोविंद यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमानंतर दुपारी ते पुन्हा शासकीय विश्रामगृह येथे पोहोचणार आहेत. गुरुवारी दुपारनंतर ते ओझर विमानतळावरून विमानाने दिल्लीला रवाना होतील.
तत्पूर्वी बुधवारी सायंकाळी साडेसात वाजता राष्टÑपतींचे ओझर विमानतळावर आगमन झाले. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, पालकमंत्री गिरीश महाजन, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, विशेष पोलीस महानिरीक्षक छोरिंग दोरजे, पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंग यांनी त्यांचे स्वागत केले. ओझर येथून द्वारका मार्गे ते रात्री आठ वाजेच्या सुमारास शासकीय विश्रामगृहात पोहोचले. शासकीय विश्रामगृहाला संपूर्ण सुरक्षिततेचा वेढा असून, केंद्रीय सुरक्षा बल आणि स्थानिक पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. विश्रामगृहात त्यांच्या ताफ्यातील अधिकाऱ्यांनाच प्रवेश देण्यात आलेला आहे.

Web Title: Ramnath Kovind's husband arrives in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.