रामलीलेला आजपासून सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 00:15 IST2018-10-11T23:53:39+5:302018-10-12T00:15:51+5:30
गांधीनगर येथे रामलीलेचे उद्घाटन खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते झाले. यावेळी रामलीलाचे अध्यक्ष कपिल शर्मा, मनोहर बोराडे आणि कलाकारांसह मान्यवर उपस्थित होते.

रामलीलेला आजपासून सुरुवात
नाशिक : गांधीनगर येथे रामलीलेचे उद्घाटन खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते झाले. यावेळी रामलीलाचे अध्यक्ष कपिल शर्मा, मनोहर बोराडे आणि कलाकारांसह मान्यवर उपस्थित होते.
गांधीनगर येथील ऐतिहासिक रामलीलेचे यंदा ६३ वे वर्ष आहे. आबाल-वृद्धांना या रामलीलेचे आकर्षण असते. दरवर्षी शेकडो प्रेक्षक ती पाहण्यासाठी आजही येतात. गांधीनगर प्रेसचे महाप्रबंधक आनंदकुमार सक्सेना यांच्या हस्ते शुक्रवारी प्रत्यक्ष शुभारंभ होईल. रामलीलामध्ये सर्व जातीचे कलावंत सहभागी होत असतात, हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे. हे कलावंत मोबदला न घेता भूमिका करीत असतात.