१८०० दिव्यांनी उजळले रामकुंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 00:42 IST2018-01-28T00:42:22+5:302018-01-28T00:42:46+5:30

माघ शुद्ध दशमी या तिथीनुसार दक्षिणवाहिनी गंगा अर्थात गोदावरीचा जन्मोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्त अनन्य दीपोत्सव संकल्पनेतून प्रज्वलित करण्यात आलेल्या १८०० दिव्यांनी रामकुंड परिसर उजळून निघाला होता. संध्याकाळी झालेल्या महा गोदावरी आरतीसाठी भाविकांची रामकुंडाभोवती गर्दी लोटली होती.

Ramkund, brightened by 1800 lamps | १८०० दिव्यांनी उजळले रामकुंड

१८०० दिव्यांनी उजळले रामकुंड

नाशिक : माघ शुद्ध दशमी या तिथीनुसार दक्षिणवाहिनी गंगा अर्थात गोदावरीचा जन्मोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्त अनन्य दीपोत्सव संकल्पनेतून प्रज्वलित करण्यात आलेल्या १८०० दिव्यांनी रामकुंड परिसर उजळून निघाला होता. संध्याकाळी झालेल्या महा गोदावरी आरतीसाठी भाविकांची रामकुंडाभोवती गर्दी लोटली होती.  दरवर्षी माघ शुद्ध दशमीला गोदावरीचा जन्मोत्सव साजरा केला जातो. हा जन्मोत्सव श्री गंगा गोदावरी माघ मास जन्मोत्सव म्हणून ओळखला जातो. गंगा-गोदावरी पंचकोठी (पुरोहित) संघाच्या वतीने रामकुंडावर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. बुधवारी (दि.२४) सप्तमीला यज्ञ भूमिपूजन दुपारी पार पडले. दशमीच्या मुहूर्तावर शनिवारी (दि.२७) सकाळी साडेदहा ते दुपारपर्यंत गोदा जन्माचे कीर्तन व विश्वकल्याणार्थ पंचदिन जन्मोत्सव महापूजा शिव-पंचायतन महायज्ञ पूजा करण्यात आली. तसेच संध्याकाळी साडेसात वाजता गोदावरी जन्मोत्सवानिमित्त विधीवत पूजा व महाआरती करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार हेमंत गोडसे, आमदार बाळासाहेब सानप, महंत भक्तिचरणदास, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, नगरसेवक हेमलता पाटील, डॉ. प्रशांत पाटील, गोदावरी सेवा समितीचे देवांग जानी, गोदाप्रेमी राजेश पंडित आदी मान्यवरांसह भाविक उपस्थित होते पुरोहित अतुल गायधनी, वैभव दीक्षित, मधुकर दीक्षित यांनी गणपती व गोदा आरतीचे पठण केले. गोदावरी नदीची स्वच्छता कायम राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे गोदा प्रदूषणमुक्तीसाठी नाशिककर म्हणून प्रयत्न करावे, असे आवाहन सानप यांनी केले. महाआरतीप्रसंगी संपूर्ण रामकुं डाभोवती शेकडो दिवे प्रज्वलित करण्यात आल्यामुळे संपूर्ण परिसर उजळला होता. तसेच गंगा-गोदावरी मंदिरासह रामकुंडावरील वस्त्रांतरगृह, गांधी ज्योतीवर रोषणाई करण्यात आली होती. यावेळी गोदावरीचा जयघोष करण्यात आला. दरम्यान, गोदा जन्मोत्सवानिमित्त शाळकरी मुलांसाठी विविध स्पर्धाही आयोजिण्यात आल्या होत्या. श्रीराम रक्षापासून ते भावगीत-भक्तिगीतांपर्यंत विविध विषय स्पर्धेसाठी निवडण्यात आले होते. 
नाशिकचे अस्तित्व व पर्यटनासाठी गोदावरीचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यामुळे नाशिककरांनी गोदाकाठावर किमान तिच्या वाढदिवसाच्या औचित्यावर तरी हजेरी लावावी, हाच उद्देश होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनन्य दीपोत्सवाची संकल्पना जनतेपर्यंत पोहचविली. एकूण १८00 दिवे प्रज्वलित करण्यात आले होते.  - देवांग जानी, अध्यक्ष,  गोदावरी नागरी सेवा समिती

Web Title: Ramkund, brightened by 1800 lamps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.