पाटोद्यात रामेश्वर महाराज यात्रोत्सवाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 00:42 IST2018-04-19T00:42:46+5:302018-04-19T00:42:46+5:30

पाटोदा : येवला तालुक्यातील पाटोदा येथील ग्रामदैवत रामेश्वर महाराजांच्या तीन दिवस चाललेल्या यात्रोत्सवाची बुधवारी भाविकांच्या मांदियाळीत उत्साहात सांगता झाली .यात्रेनिमित्त तीन दिवसात रामेश्वर महाराजांचे सुमारे लाखभर भाविकांनी दर्शन घेतले. यात्रेनिमित्त शिवतलंगाची पूजा, कावडी मिरवणूक ,मल्लखांब व तमाशा, तसेच आॅर्केस्ट्रा चे आयोजन करण्यात आले होते.

Rameshwar Maharaj's Yatra in Patodh | पाटोद्यात रामेश्वर महाराज यात्रोत्सवाची सांगता

पाटोद्यात रामेश्वर महाराज यात्रोत्सवाची सांगता

ठळक मुद्देग्रामदैवत रामेश्वर महाराजांच्या तीन दिवस चाललेल्या यात्रोत्सवाकुस्त्यांचे सामने चुरशीत

पाटोदा : येवला तालुक्यातील पाटोदा येथील ग्रामदैवत रामेश्वर महाराजांच्या तीन दिवस चाललेल्या यात्रोत्सवाची बुधवारी भाविकांच्या मांदियाळीत उत्साहात सांगता झाली .यात्रेनिमित्त तीन दिवसात रामेश्वर महाराजांचे सुमारे लाखभर भाविकांनी दर्शन घेतले.
यात्रेनिमित्त शिवतलंगाची पूजा, कावडी मिरवणूक ,मल्लखांब व तमाशा, तसेच आॅर्केस्ट्रा चे आयोजन करण्यात आले होते. मंदिर परिसरात केलेली विद्युत रोषणाई लक्षवेधी ठरली .यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या कुस्त्यांच्या सामन्यासाठी उत्तर महाराष्ट्र केसरी धर्म शिंदे, योगेश खैरे, मंगल परदेशी, अली पहीलवान, गोपाळ कडनोर, हरी बनसोडे, विकी कोळपे, लक्ष्मण गवळी, ज्ञानेश्वर मार्तंड या सारख्या मंडळींनी हजेरी लावल्याने कुस्त्यांचे सामने चुरशीत झाले. कुस्त्यांसाठी १०१ ते ७००१ रु पयांचे रोख पारितोषिके देण्यात आली. यावेळी रतन बोरनारे, पुंडलिक पाचपुते, तुकाराम बोराडे, संपत बोरनारे, अण्णा दौंडे, साहेबराव बोराडे उस्मान शेख, पोलीस पाटील मुजामील चौधरी, बाळासाहेब पिंपरकर, जाफरभाई पठाण , प्रभाकर बोरनारे आदी उपस्थित होते.
यात्रेनिमित्त पंधरा सोळा लाखांची आर्थिक उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यात्रा शांतेत पार पडावी यासाठी येवला तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार मच्छिंद्र पठाडे, संजीवकुमार मोरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

Web Title: Rameshwar Maharaj's Yatra in Patodh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक