सप्तशृंगगड सरपंचपदी रमेश पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 00:28 IST2021-02-16T21:01:32+5:302021-02-17T00:28:12+5:30
सप्तश्रृंगगड : येथील ग्रामपंचायतीची सत्ता माकपच्या हातात गेली. सरपंचपदी रमेश शंकर पवार तर उपसरपंचपदी जयश्री धनेश गायकवाड यांची बिनविरोध ...

सप्तशृंगगड सरपंचपदी रमेश पवार
ठळक मुद्दे उपसरपंचपदी जयश्री गायकवाड यांची बिनविरोध निवड
सप्तश्रृंगगड : येथील ग्रामपंचायतीची सत्ता माकपच्या हातात गेली. सरपंचपदी रमेश शंकर पवार तर उपसरपंचपदी जयश्री धनेश गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंच व उपसरपंच यांची ढोल ताशांच्या गजरात संपूर्ण गावातून मिरवणूक काढली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वसंत शिरसाठ यांनी काम पाहिले. निवडणूक कामकाजास सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तलाठी ए. पी. वाघ, ग्रामसेवक संजय देवरे, कॉम्रेड माजी सरपंच सुरगाणा सुरेश गवळी हे होते. यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य संदीप बेनके, सुवर्णा पवार, मनीषा गवळी, बेबीबाई जाधव उपस्थित होते.