घोटी येथे रामदेवजी बाबा दशमी उत्सव

By Admin | Updated: September 11, 2016 01:19 IST2016-09-11T01:19:39+5:302016-09-11T01:19:50+5:30

घोटी येथे रामदेवजी बाबा दशमी उत्सव

Ramdevji Baba Dashmi festival at Ghoti | घोटी येथे रामदेवजी बाबा दशमी उत्सव

घोटी येथे रामदेवजी बाबा दशमी उत्सव

घोटी : इगतपुरी तालुक्यातील मारवाडी, गुजराती समाजासह इतर समाजबांधवांचे श्रद्धास्थान श्री रामदेवजी बाबा मंदिर येथे दशमी महोत्सवानिमित्त ११ व १२ सप्टेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दि़ ११ रोजी भादवा सुदी नवमीनिमित्त भव्य जम्मा जागरणाचे आयोजन करण्यात आले असून, प्रसिद्ध गायक अभिषेक दायमा यांच्या मधुरवाणीने जम्मा जागरण रात्री ८ वाजता भरतभाई पटेल सॉ मिल
येथे आयोजित करण्यात आला
आहे.
दि. १२ रोजी दशमी उत्सवास प्रारंभ होणार असून, सकाळी व संध्याकाळी ७ वाजता महाआरतीचे आयोजन करण्यात आले असून, या उत्सवास व जम्मा जागरणाचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक रामदेव बाबा उत्सव समितीने केले आहे. (वार्ताहर)

Web Title: Ramdevji Baba Dashmi festival at Ghoti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.