रामदास आठवले यांनी केले जावळे परिवाराचे सांत्वन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 00:26 IST2017-09-19T00:25:54+5:302017-09-19T00:26:00+5:30

Ramdas Athavale said the consolation of Javale family | रामदास आठवले यांनी केले जावळे परिवाराचे सांत्वन

रामदास आठवले यांनी केले जावळे परिवाराचे सांत्वन


येवल्यातील रिपाइंचे दिवंगत नेते पापा जावळे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करताना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले व कार्यकर्ते.

येवला : नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा रिपब्लिकन पार्टीचे ज्येष्ठ नेते पापा जावळे यांचे निधन झाले. या पार्श्वभूमीवर रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येवला येथे त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन जावळे परिवाराचे सांत्वन केले.
सायंकाळी ५ वाजता आठवले यांचे येवल्यात आगमन झाले. त्यांनी जावळे यांच्या निवासस्थानी भेट घेऊन दिवंगत नेते पापा जावळे यांच्या प्रतिमेला पुप्षहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी बोलताना आठवले म्हणाले पापा जावळे यांनी दलित पँथर या संघटनेत काम केले असून रिपाईत देखील त्यांनी प्रामाणकिपणे काम केले जावळे यांच्या जाण्याने रिपाई चे मोठे नुकसान झाले आहे. रिपाइचा एक लढवय्या नेता हरपला . यावेळी रिपाई चे नेते काकासाहेब खंबाळकर, जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, प्रकाश मकासरे, यांनी दिवंगत नेते पापा जावळे यांना श्रध्दांजली अर्पण केली. रिपाइंचे नेते गुड्डु जावळे आणि जावळे परीवारांचे रामदास आठवले यांनी सांत्वन केले या प्रसंगी रिपाईचे श्रीकांत भालेराव, बाबुराव कदम, पवन पवार, प्रियकीर्ती त्रिभुवन, फकीरा जगताप, विश्वनाथ काळे, मोजेस साळवे, मनमाड न पा चे उपनगराध्यक्ष राजाभाऊ अहीरे, गंगा त्रिभुवन, दिनकर धिवर, देविदास निकम, दत्तु वाघ, समाधान पगारे, संजय पगारे, भगवान साबळे, जावळे परीवारातील श्रावण जावळे, दिपक जावळे, गुड्डु जावळे, अर्जुन जावळे, दयानंद जावळे, मनोहर जावळे आदी उपस्थित होते.

Web Title: Ramdas Athavale said the consolation of Javale family