शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

राममंदिर भूमिपूजनाचे राजकारण करू नये : आव्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 01:28 IST

राममंदिर भूमिपूजनाचा विषय श्रद्धा आणि अस्मितेचा असून, या मुद्द्यावरून कुणी राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये, असे प्रतिपादन राज्याचे गृहराज्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले.

नाशिक : राममंदिर भूमिपूजनाचा विषय श्रद्धा आणि अस्मितेचा असून, या मुद्द्यावरून कुणी राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये, असे प्रतिपादन राज्याचे गृहराज्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले.सिडको परिसरात तयार करण्यात आलेल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कोविड रुग्णालयाचे उद्घाटन आव्हाड यांच्या हस्ते झाले. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. येत्या ५ आॅगस्ट रोजी अयोध्येत राममंदिराचा भूमिपूजन सोहळा होत आहे. यापार्श्वभूमीवर आव्हाड यांना माध्यमांनी प्रश्न विचारला असता त्यांनी भाजपाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करीत प्रभू श्रीराम कुण्या एकाच्या सातबारावर नाहीत आणि तो सातबारा कुणाच्या मालकीचादेखील नसल्याचे विधान करीत भाजपवर निशाणा साधला. श्रीरामाच्या नावाने भक्ती करणे आणि राजकारण करणे वेगळे असून, भाजपने गेली ४० वर्षे श्रीरामाच्या नावानेच राजकारण केले, असा आरोपही आव्हाड यांनी यावेळी केला.दरम्यान, प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक भूमितील आपण भूमिपुत्र असून, महाराष्ट्र कोरोनामुक्त होवो अशीच आपली प्रार्थना असल्याचे आव्हाड म्हणाले.या कार्यक्रमप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेता विलास शिंदे, नगरसेवक किरण गामणे, बाळा दराडे, सुधाकर बडगुजर, पुंजाराम गामने, महानगरप्रमुख महेश बडवे, दीपक गामने आदी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाJitendra Awhadजितेंद्र आव्हाड