देवळा येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 17:49 IST2018-10-20T17:49:01+5:302018-10-20T17:49:21+5:30

देवळा : देवळा शहरातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे पथसंचलन व शस्त्रपूजन करण्यात आले.

Rally of Rashtriya Swayamsevak Sangh at Devla | देवळा येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन

देवळा येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन

देवळा : देवळा शहरातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे पथसंचलन व शस्त्रपूजन करण्यात आले. यावेळी जिल्हा कार्यवाह सुनील चव्हाण, सहकार्यवाह बाबासाहेब गांगुर्डे, तालुका कार्यवाह अशोक मोरे, जिल्हा प्रचारप्रमुख बापू शिंदे, काशीनाथ सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. भगवा ध्वज, दंड, घोषपथक यांच्यासह स्वयंसेवक पथसंचलनात सहभागी झाले. संचलन पाहण्यासाठी नागरिकांनी उत्सुकता दर्शवली. समारोपानंतर शस्त्रपूजन करण्यात येऊन सुभाषित, अमृतवचन, पद्य सादर करण्यात आले. तालुका सहकार्यवाह काशीनाथ सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी तालुक्यातील स्वयंसेवक उपस्थित होते. पुंडलिक अहेर यांनी संयोजन केले.

 

Web Title: Rally of Rashtriya Swayamsevak Sangh at Devla

टॅग्स :Dasaraदसरा