जागतिक हिवताप दिनानिमित्ताने रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 00:20 IST2019-04-26T00:20:14+5:302019-04-26T00:20:51+5:30

जागतिक हिवताप दिनानिमित्ताने शहरातून हिवताप निर्मूलन जनजागृती रॅली काढण्यात आली. नागरिकांना सजग राहण्याचे आवाहन करण्याबरोबरच ‘हिवताप झिरो करू या’, अशा घोषणा देत शहरातून रॅली काढण्यात आली.

 Rally on the occasion of global malaria | जागतिक हिवताप दिनानिमित्ताने रॅली

जागतिक हिवताप दिनानिमित्ताने रॅली

नाशिक : जागतिक हिवताप दिनानिमित्ताने शहरातून हिवताप निर्मूलन जनजागृती रॅली काढण्यात आली. नागरिकांना सजग राहण्याचे आवाहन करण्याबरोबरच ‘हिवताप झिरो करू या’, अशा घोषणा देत शहरातून रॅली काढण्यात आली.
जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, जिल्हा हिवताप कार्यालय, जिल्हा रुग्णालय व नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हिवताप जनजागरण सप्ताहा अंतर्गत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे उद्घाटन आरोग्य उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. गायकवाड, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. त्र्यंबके, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखील सैंदाणे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी हिवतापाच्या जनजागरणतेची शपथ घेण्यात आली. रॅलीची सुरु वात जिल्हा रुग्णालयापासून जिल्हा परिषद, गंजमाळ सिग्नल, शालिमार सीबीएसमार्गे पुन्हा जिल्हा रुग्णालयात येऊन रॅलीची सांगता झाली. या रॅलीमध्ये आरोग्य सेवक व सेविका यांनी सहभाग घेतला. रॅलीमध्ये कर्मचाऱ्यांनी हिवताप जनजागरणाच्या घोषणा देऊन नागरिकांचे लक्ष वेधले. विविध माध्यमांचा वापर करून जिल्ह्यामध्ये जनजागरण सप्ताह सुरू करण्यात आला. ‘हिवताप झिरो करू, माझ्यापासून सुरुवात करू’ असे यंदाचे घोषवाक्य असल्याचेही जाहीर करण्यात आले.
डासांची उत्पत्ती रोखण्याबाबत माहिती
जास्तीत जास्त नागरिकांनी हिवतापविषयी माहिती घेऊन आपला परिसर, आपली घरे डासविरहित कशी राहतील, त्यांची उत्पत्ती कशाप्रकारे कमी होईल याकडे सर्व लोकांनी गंभीरतेने बघितले पाहिजे व इतरांना याविषयी माहिती दिली पाहिजे, असे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले.

Web Title:  Rally on the occasion of global malaria