पंचवटी शिवजन्मोत्सव अध्यक्षपदी राजवाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:40 IST2021-02-05T05:40:56+5:302021-02-05T05:40:56+5:30
पंचवटी : दरवर्षीप्रमाणे यंदा पंचवटी परिसरात शिवजन्मोत्सव पारंपरिक उत्साहात डीजे विरहीत साजरा केला जाणार असल्याचा निर्णय शिवप्रेमींच्या बैठकीत घेण्यात ...

पंचवटी शिवजन्मोत्सव अध्यक्षपदी राजवाडे
पंचवटी : दरवर्षीप्रमाणे यंदा पंचवटी परिसरात शिवजन्मोत्सव पारंपरिक उत्साहात डीजे विरहीत साजरा केला जाणार असल्याचा निर्णय शिवप्रेमींच्या बैठकीत घेण्यात आला. दिंडोरी रोडवरील कच्छी लोहाणा मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीत पंचवटी शिवजन्मोत्सव समिती कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यात शिवजन्मोत्सव समिती अध्यक्षपदी मामा राजवाडे यांची व उपाध्यक्षपदी सतनाम राजपूत, दिगंबर मोगरे यांची तर कार्याध्यक्ष म्हणून उल्हास धनवटे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
१९ फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव साजरा होत असून, उत्सवाचे नियोजन करण्यासाठी शिवप्रेमींची बैठक झाली. प्रास्ताविक मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक तुषार जगताप यांनी केले. देशावर असलेले कोरोना महामारी संकट लक्षात घेऊन मिरवणुकीत बिभत्स नाच, गाणे असे अशोभनीय वर्तन न करण्याचे बंधन पाळण्यासह टोलेजंग मिरवणूक काढून डीजेसह आरडाओरडा करून बाईक रॅली काढत उत्सवाला गालबोट लावण्याचा प्रयत्न न करण्याचे यावेळी ठरविण्यात आले. या कार्यकारिणीत सरचिटणीस संदीप लकडे, करण टिळे, चिटणीस राहुल क्षीरसागर, सुरेश सोळंके, खजिनदार राजेश कदम, अमित नडगे, सहखजिनदार शाहू पवार, नीलेश आल्हाटे, मुख्य समन्वयक तुषार जगताप, अजय बागुल, विलास जाधव, सचिन पवार, प्रवीण भाटे, संजय फडोळ, संदीप देशमुख, आदींची निवड करण्यात आली. नरेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले. या बैठकीला नगरसेवक जगदीश पाटील, खंडू बोडके, कविता कर्डक, अजय बागुल, उद्धव पवार, चांगदेव गुंजाळ, नंदू पवार, लक्ष्मण धोत्रे, देवांग जानी उपस्थित होते. (फोटो २७ राजवाडे)