राजीवनगर, इंदिरानगर परिसरात कमी दाबाने पाणी
By Admin | Updated: October 25, 2016 01:38 IST2016-10-25T01:37:46+5:302016-10-25T01:38:30+5:30
राजीवनगर, इंदिरानगर परिसरात कमी दाबाने पाणी

राजीवनगर, इंदिरानगर परिसरात कमी दाबाने पाणी
इंदिरानगर : परिसरात अद्यापही सणासुदीच्या काळात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने चेतनानगर, राजीवनगर आणि इंदिरानगर परिसरात टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. परिसरात पाणीपुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे मानसिक आणि आर्थिक त्रासास सामोरे जावे लागत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
दिवाळी सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे घराघरांत महिलावर्गाचे स्वच्छतेचे काम सुरू आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून सकाळी आणि सायंकाळी होणारा पाणीपुरवठा कमी वेळात आणि अत्यंत कमी दाबाने होत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून चेतनानगर, राजीवनगर, जाखडीनगर, गणेशनगर, महारुद्र कॉलनी, पाटील गार्डन, अरुणोदय सोसायटी, मानस कॉलनीसह परिसरामध्ये अत्यंत कमी दाबाने आणि कमी वेळ पाणीपुरवठा होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सणासुदीच्या काळात महिलावर्गास पाण्यासाठी हातपंपावर चकरा माराव्या लागत आहे. तसेच काही ठिकाणी मनपाच्या वतीने आणि स्वखर्चाने टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच मनपाच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता उडवा उडवीची उत्तरे देण्यात आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, राजीवनगर, इंदिरानगर भागात नगरसेवक सतीश सोनवणे, डॉ. दीपाली कुलकर्णी व अर्चना जाधव यांनी टॅँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. (वार्ताहर)