पतसंस्था फेडरेशनच्या कार्याध्यक्षपदी राजेंद्र अंकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 18:24 IST2019-06-22T18:23:01+5:302019-06-22T18:24:05+5:30
सिन्नर तालुका पतसंस्था फेडरेशनच्या कार्याध्यक्षपदी राजेंद्र अंकार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

पतसंस्था फेडरेशनच्या कार्याध्यक्षपदी राजेंद्र अंकार
सिन्नर : सिन्नर तालुका पतसंस्था फेडरेशनच्या कार्याध्यक्षपदी राजेंद्र अंकार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. येथील आझाद नागरी पतसंस्थेच्या कार्यालयात पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष युनूस शेख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निवड झाली. फेडरेशनचे सचिव नामकर्ण आवारे यांनी अंकार यांच्या नावाची सूचना मांडली. त्यास संचालक रामनाथ डावरे यांनी अनुमोदन दिले. फेडरेशन जिल्हा कार्याध्यक्ष नारायण वाजे यांनी अंकार यांचा सत्कार केला. यावेळी मच्छिंद्र चिने, इलाहीबक्ष शेख, अंबादास वाजे, विलास पाटील उपस्थित होते. बैठकीत पतसंस्थेच्या विविध अडचणींसंदर्भात चर्चा झाली.