मुक्तानंदमध्ये राजर्षि शाहू महाराज जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 23:53 IST2021-06-26T23:52:45+5:302021-06-26T23:53:23+5:30

येवला : शहरातील स्वामी मुक्तानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

Rajarshi Shahu Maharaj Jayanti in Muktanand | मुक्तानंदमध्ये राजर्षि शाहू महाराज जयंती

मुक्तानंदमध्ये राजर्षि शाहू महाराज जयंती

ठळक मुद्दे३० विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षिसे

येवला : शहरातील स्वामी मुक्तानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रारंभी संस्थेचे सेक्रेटरी दीपक गायकवाड यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्यात आली. यावेळी प्राचार्य मुरलीधर पहिलवान, उपप्राचार्य अंबादास ढोले, गजेंद्र धिवर उपस्थित होते. सुप्रिया हुलगुंडे या विद्यार्थिनीने शाहू महाराज यांची जीवनगाथा आपल्या भाषणातून सांगितली. यावेळी निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आली. ३० विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षिसे प्रदान करण्यात आली. सूत्रसंचालन करून आभार उत्सव प्रमुख डॉ. प्रसादशास्त्री कुळकर्णी यांनी मानले.
 

Web Title: Rajarshi Shahu Maharaj Jayanti in Muktanand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.