अंदरसूल परिसरात वरु णराजाची हजेरी

By Admin | Updated: August 29, 2015 00:11 IST2015-08-29T00:11:00+5:302015-08-29T00:11:00+5:30

अंदरसूल परिसरात वरु णराजाची हजेरी

Rajaraja Raja's presence in the area | अंदरसूल परिसरात वरु णराजाची हजेरी

अंदरसूल परिसरात वरु णराजाची हजेरी

अंदरसूल : अखेर दोन महिन्यांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर अंदरसूल परिसरासह हजेरी लावली. परंतु काही वेळातच पाऊस पुन्हा बंद झाला. शुक्रवारी किमान हजेरी लावलेल्या पावसाने बळीराजाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.
या पावसाने शेतकऱ्यांंच्या चेहऱ्यावरील आनंद दिसत होता. वरुणराजाने असेच बरसत राहावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
आजच्या पावसामुळे शेतकरी शेतीच्या कामाला पुन्हा जुंपले जाण्याची शक्यता आहे. परंतु यावेळी मात्र सावध पवित्र घेत पुरेसा पाऊस झाल्यानंतरच पुढील पिकांचे नियोजन होणार आहे. आधीचे पीक पूर्ण जाळून गेले असून, दुबारऐवजी आता तिबार पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे, तरीदेखील अद्याप लाल फितीच्या कारभारामुळे राज्य शासनाकडून अजूनही ठोस मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही.
कांदा रोपाचे भाव गगनाला भिडण्याची शक्यता नाकारता येत नाही. (वार्ताहर)

Web Title: Rajaraja Raja's presence in the area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.