राजापूरकर यांनी उलगडला प्राचीन नाण्यांचा इतिहास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 15:50 IST2018-09-21T15:49:51+5:302018-09-21T15:50:46+5:30
पहिल्या शतकातील अत्यंत दुर्मिळ नाणी, सुमारे २२०० वर्षांपूर्वी नाशिकमध्ये चलनात असलेले नाणे, नागनिका राणीच्या नावाने निघालेले पहिले नाणे, नहपान कालीन, ब्राम्हीकालीन,

राजापूरकर यांनी उलगडला प्राचीन नाण्यांचा इतिहास
नाशिक : नाशिकच्या सामर्थशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या नाण्यांसह शिवकालीन मुद्रा, शस्रास्त्र व मुघल काळात अस्तित्वात असलेली नाणी, नजराणे, मोहरा, महाराष्ट्राचे पहिले नाणे आदि इतिहासात दडलेला अमुल्य खजिना व युद्धात वापरलेली शस्त्रे पाहण्याची नामी संधी दि नाशिक सराफ असोसिएशन गणेशोत्सव मंडळाच्या वतीने नाशिककरांना उपलब्ध करून देण्यात आली होती.
गुरुवारी दुपारी सराफ बाजारातील असोसिएशनच्या सभागृहात ज्येष्ठ सराफ व्यावसायिक कांतीलाल सराफ यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद््घाटन झाले. यावेळी सराफ असोसिएशन अध्यक्ष प्रमोद कुलथे, गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष महेश दिंडोरकर, नाशिक कॉइन कलेक्टर सोसायटीचे अध्यक्ष अनंत धामणे, चेतन राजापूरकर, लक्ष्मीकांत वर्मा, मेहुल थोरात, कृष्णा नागरे आदी उपस्थित होते. नाशिक शहरातील सर्वात जुने व तब्बल १०८ वर्षांचा समृद्ध इतिहास असलेल्या या गणेशोत्सव मंडळातर्फे गणेशोत्सव कार्यकाळात नेहमीच समाजोपयोगी कार्यक्रम राबविले जात असून, त्याचाच एक भाग म्हणून या एकदिवसीय विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसिद्ध इतिहास अभ्यासक तथा प्राचीन नाणे संग्राहक चेतन राजापूरकर यांच्या संग्रहातील पहिल्या शतकातील अत्यंत दुर्मिळ नाणी, सुमारे २२०० वर्षांपूर्वी नाशिकमध्ये चलनात असलेले नाणे, नागनिका राणीच्या नावाने निघालेले पहिले नाणे, नहपान कालीन, ब्राम्हीकालीन, शिवकालीन होन, सातवाहन काळातील कृष्णराजाच्या कालखंडातील नाणे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडातील नाणी, मुघलसाम्राज्यात दिल्या जाणाºया मोहरा-नजराणे, ओतीव नाणी बनविण्याची पद्धत असा अमुल्य खजिना या प्रदर्शनात मांडण्यात आला होता. तर तलवारी, भाले, दांडपट्टे, खंजीर असे शिवकालीन शस्त्रे प्रदर्शनास भेट देणाºयांना पाहता आली.