सिन्नरच्या आरोग्य केंद्रांना साहित्याचे वितरण राजाभाऊ वाजे : सामाजिक दायित्वाच्या भावनेतून सेवा गोरगरिबांपर्यंत पोहचेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 00:14 IST2018-04-06T00:14:00+5:302018-04-06T00:14:00+5:30
सिन्नर : लोकवर्गणीतून व सामाजिक दायित्वाबद्दल असलेल्या भावनेमुळे खऱ्या अर्थाने उत्तम दर्जाच्या सेवा गोरगरिबांपर्यंत पोहचतील, असा आशावाद आमदार राजाभाऊ वाजे यांनी व्यक्त केला.

सिन्नरच्या आरोग्य केंद्रांना साहित्याचे वितरण राजाभाऊ वाजे : सामाजिक दायित्वाच्या भावनेतून सेवा गोरगरिबांपर्यंत पोहचेल
सिन्नर : लोकवर्गणीतून व सामाजिक दायित्वाबद्दल असलेल्या भावनेमुळे खऱ्या अर्थाने उत्तम दर्जाच्या सेवा गोरगरिबांपर्यंत पोहचतील, असा आशावाद आमदार राजाभाऊ वाजे यांनी व्यक्त केला. येथील पंचायत समिती कार्यालयात सुरेंद्र द्वारकानाथ क्षत्रिय यांच्या वतीने सिन्नर तालुक्यातील सर्व आरोग्य केंद्रांना आरोग्यविषयी उपकरणे व साहित्याचे वितरण करण्यात आले, यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात आमदार वाजे बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमास व्यासपीठावर पंचायत समितीच्या सभापती सुमन बर्डे, उपसभापती वेणूताई डावरे, जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, सुरेंद्र क्षत्रिय, गटविकास अधिकारी नंदुकमार वाणी, सहायक गटविकास अधिकारी रत्नाकर पगार आदींसह मान्यवर उपस्थित होते. आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, पंचायत समिती सभापती सुमन बर्डे यांच्या हस्ते तालुक्यातील सहा आरोग्य केंद्रांसाठीचे साहित्य तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन बच्छाव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी गटनेते संग्राम कातकाडे, विरोधी गटनेते विजय गडाख, सदस्य जगन्नाथ भाबड, रवींद्र पगार, भगवान पथवे, तातू जगताप, शोभा बर्के, योगिता कांदळकर, संगीता पावसे यांच्यासह सर्व सहा आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.