शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

राज ठाकरे यांच्या ‘ड्रिम प्रोजेक्ट’ला टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 11:08 PM

मनसेची नाशिक महापालिकेत सत्ता असताना राज ठाकरे यांनी पाठपुरावा करून पांडवलेण्याजवळ वनखात्याच्या वनौषधी उद्यानात सुरू केलेल्या लेझर शोला ग्रहण लागले असून, गेल्या सुमारे वर्षभरापासून तो बंद आहे.

ठळक मुद्देबोलक्या झाडांचा लेझर शो : वनखात्याच्या निधीअभावी बंद

नाशिक : मनसेची नाशिक महापालिकेत सत्ता असताना राज ठाकरे यांनी पाठपुरावा करून पांडवलेण्याजवळ वनखात्याच्या वनौषधी उद्यानात सुरू केलेल्या लेझर शोला ग्रहण लागले असून, गेल्या सुमारे वर्षभरापासून तो बंद आहे. लेझर यंत्रणेतील तांत्रिक दोष शोधण्याच्या कामासाठी पाच लाख रुपये संबंधित एजन्सीला द्यावे लागणार आहे. परंतु लेझर शोच्या माध्यमातून सुमारे ८० लाख रुपये कमविणाऱ्या वनखात्याकडे एजन्सीला देण्यासाठी पाच लाख रुपये देण्याची तरतूद नसल्याने हा घोळ झाला आहे.राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये मोजकेच, परंतु आगळेवेगळे प्रकल्प राबविण्याचे नियोजन केले. त्याअंतर्गत पांडवलेण्याच्या पायथ्याशी वनखात्याच्या वनौषधी उद्यानात लेझर शो राबविण्याचे ठरविले होते. वनखात्याकडून जागा मिळण्यात अनेक अडचणी आल्यानंतरही त्यांनी पाठपुरावा करून ही जागा विकासासाठी ताब्यात घेतली आणि टाटा उद्योग समूहाच्या माध्यमातून लेझर शो साकारला. वृक्षांचे अरण्यरुदन असलेला हा शो खूपच चर्चेत ठरला असताना वनखात्याची सुटी तर कधी पावसाळा अशा कारणातून तो बंद असतो. कित्येकदा तांत्रिक बिघाडामुळेही तो बंद पडत आहे. आताही गेल्या वर्षभरापासून तो बंद असून, त्यामुळे मनसे कार्यकर्तेही अस्वस्थ आहेत.महापालिकेच्या प्रशासनाला त्यांनी साकडे घातल्यानंतर वनखात्याशी संपर्क करण्यात आला. मात्र दुरुस्ती करणाºया एजन्सीला पाच लाख रुपये द्यावे लागणार असून मग ही संस्था बिघाड शोधेल आणि त्यानंतर दुरुस्तीची कामे करावी लागणार आहे. वनखात्याकडे त्यासाठी कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे अडचण झाली असून, आता त्यांनी शासनाकडे पत्रव्यवहार सुरू केला आहे.शासनाकडून पाच लाख रुपये मिळाले, तर हा प्रकल्प सुरू होईल अन्यथा गोदापार्कप्रमाणेच राज ठाकरे यांचा हा प्रकल्पही पाण्यात जाण्याची शक्यता आहे.देखभाल दुरुस्तीसाठी अडचणलेझर शोसाठी तिकीट असून, त्या माध्यमातून आत्तापर्यंत वनखात्याला सुमारे ८० लाख रुपये मिळाले आहेत. परंतु लेझर शोच्या देखभाल दुरुस्तीसाठी कोणतीही वेगळे खाते नाही की लेखाशीर्ष नाही त्यामुळे अडचण निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :NashikनाशिकRaj Thackerayराज ठाकरे