शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरे म्हणतात,  मंत्र्यांना कांदे फेकून मारा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 01:32 IST

कळवण : कांदे रस्त्यावर फेकू नका.  त्यात तुमचेच नुकसान होणार आहे. सरकारला काही फरक पडत नाही.  त्यामुळे तुम्ही युतीच्या ...

कळवण : कांदे रस्त्यावर फेकू नका.  त्यात तुमचेच नुकसान होणार आहे. सरकारला काही फरक पडत नाही.  त्यामुळे तुम्ही युतीच्या मंत्र्यांना कांदे  फेकून मारा, असा सल्ला महाराष्ट नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कळवण येथे कांदा उत्पादकांशी संवाद साधताना दिला.  कांदा लागल्याने जर मंत्री बेशुद्ध पडला तर तोच कांदा फोडा आणि त्याच्या नाकाला लावा, असेही सांगायला राज विसरले नाहीत. दरम्यान, कळवण आणि सटाणा येथे राज यांच्या दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.दोन दिवसांपासून जिल्हा दौºयावर असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी (दि. १९) कळवण येथील पदाधिकारी, कांदा उत्पादक शेतकरी, व्यापारी व उद्योजक यांच्यासह बेरोजगार युवा-युवती यांच्याशी संवाद साधला. राज यांचे कळवण शहरात आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल ताश्यांच्या गजरात मनसैनिकांनी स्वागत केले. उद्योगपती बेबीलाल संचेती यांच्या निवासस्थानी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आगमन झाल्यानंतर बेबीलाल संचेती यांच्यासह सुनील संचेती, निर्मला संचेती तसेच मनसे तालुकाध्यक्ष शशी पाटील, शहराध्यक्ष डॉ. दीपक शेवाळे, माजी शहराध्यक्ष नितीन पगार यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी माजी सैनिक संघटना, महाराष्ट्र कोतवाल संघटना, डॉक्टर असोसिएशन यांनी भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले. याप्रसंगी मनसे तालुकाप्रमुख शशिकांत पाटील, शहराध्यक्ष डॉ. दीपक शेवाळे, अजय दुबे, उपाध्यक्ष चेतन मैंद, दीपक दुसाने, कृष्णा जगताप, उमेश भास्कर, सुरज पगार, नीलेश शिंदे, केदा गवांदे, संदीप पवार, रोहन निकम, रोशन निकम, अक्षय सोनवणे, उदय सोनवणे, पराग मालपुरे, कुणाल वडखळे, सुशांत मोरे, विनय कोठावदे, अमोल सोनवणे, उदय पिंगळे, आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.मुंबईला येण्याचे आमंत्रणकांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने कळवण तालुक्यातील शेतक-यांच्या शिष्टमंडळाने राज ठाकरे यांची भेट घेऊन कांदा प्रश्नावर लक्ष घालण्याची विनंती केली. राज ठाकरे यांनी कांदा प्रश्नावर चर्चा करण्यासाठी कळवण तालुक्यातील कांदा उत्पादकांना मुंबई येथे आमंत्रित केले. कांदा प्रश्न नेमका काय आहे, याचीही त्यांनी माहिती जाणून घेतली. कांदा प्रश्नावर प्रगतिशील शेतकरी मधुकर पगार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, मुरलीधर पगार, राकेश पाटील, पंडित वाघ ,पांडुरंग पगार यांनी चर्चा केली.शेतकरीप्रश्नी आंदोलनशेतकरी साथ देतील तर मनसे रस्त्यावर उतरतील, असे सांगत राज ठाकरे यांनी शेतकºयांच्या प्रश्नावर लवकरच आंदोलन छेडले जाणार असल्याचेही स्पष्ट केले.पक्षाचे पदाधिकारी आंदोलन करतील त्यात तुम्ही सहभागी होणार का, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थितांशी बोलताना केला.

टॅग्स :onionकांदाRaj Thackerayराज ठाकरेNashikनाशिकFarmerशेतकरी