नाशिक पोलीस दलाचे मनोबल उंचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:30 IST2021-09-02T04:30:24+5:302021-09-02T04:30:24+5:30
--इन्फो--- ...यांचा झाला सन्मान ओझर विमानतळ सुरक्षाधिकारी म्हणून कर्तव्य बजावणारे ग्रामीण पोलीस दलाचे उपनिरीक्षक अशोक उत्तम अहिरे, ग्रामीण राज्य ...

नाशिक पोलीस दलाचे मनोबल उंचावले
--इन्फो---
...यांचा झाला सन्मान
ओझर विमानतळ सुरक्षाधिकारी म्हणून कर्तव्य बजावणारे ग्रामीण पोलीस दलाचे उपनिरीक्षक अशोक उत्तम अहिरे, ग्रामीण राज्य गुप्त वार्ता विभागाचे उपनिरीक्षक विष्णू बहिरू पाटील, शहर पोलीस दलातील हवालदार संतू शिवनाथ खिंडे, सहायक उपनिरीक्षक अनंत साहेबराव पाटील यांना ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ यांच्या स्वाक्षरीचे विशेष सन्मानपत्र आणि दीपोत्सव अंकाची प्रत पाेलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या हस्ते भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
--इन्फो---
गौरवाचा क्षण अविस्मरणीयच...!
राष्ट्रपती पोलीस पदकासाठी निवड होणे ही आमच्यासाठी नक्कीच अभिमानास्पद बाब आहे. मात्र, या पदकाचे महत्त्व जाणत ‘लोकमत’ने दखल घेत आमचा कार्यालयात सन्मानपत्र देऊन आमच्या पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिकारी यांच्या हस्ते गौरव करणे ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे, तसेच हा गौरवाचा क्षण अविस्मरणीय असाच आहे, अशी भावना अशोक अहिरे, संतू खिंडे यांनी व्यक्त केली, तर विष्णू पाटील यांनी वाढदिवसाला ‘लोकमत’कडून मला बहुमूल्य ‘गिफ्ट’ मिळाल्याची भावना व्यक्त केली.
310821\31nsk_27_31082021_13.jpg
‘लोकमत’च्या वतीने आयोजित सन्मान सोहळ्याप्रसंगी उपस्थित पोलीस अधीक्षक सचिन पाटील. समवेत उपनिरिक्षक अशोक अहिरे, विष्णु पाटील, संतु खिंडे.