रायपूरला जंगलाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 00:10 IST2020-01-29T23:12:08+5:302020-01-30T00:10:04+5:30
एका माथेफिरू महिलेने रायपूर शिवारातील ११० रेल्वेगेट लगत असलेल्या राखीव जंगलात आपल्या जवळील भाजीपाला भाजून खाण्याच्या नादात वाळलेल्या गवतास आग लागल्याने जवळपास ५ एकराच्या आसपास क्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. त्यामुळे सदर परिसर जळून काळाकुट्ट झाला आहे.

रायपूरला जंगलाला आग
पाटोदा : एका माथेफिरू महिलेने रायपूर शिवारातील ११० रेल्वेगेट लगत असलेल्या राखीव जंगलात आपल्या जवळील भाजीपाला भाजून खाण्याच्या नादात वाळलेल्या गवतास आग लागल्याने जवळपास ५ एकराच्या आसपास क्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. त्यामुळे सदर परिसर जळून काळाकुट्ट झाला आहे.
श्री संत मुरलीधर बाबा कातरणी पतसंस्थेचे वसुली अधिकारी अशोक बंदरे या जंगलातून जात असताना त्यांना हा सर्व प्रकार लक्षात आला. त्यांनी तातडीने येवला पोलीस ठाण्यात सदर घटना कळवत तात्काळ अग्निशामक दलाच्या बंबाची मागणी केली. तसेच आगीचे रौद्ररुप वाढत असल्याने त्याची माहिती स्थानिक परिसरातील नागरिकांनाही दिली. दरम्यान, वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी हजर झाले. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग पूर्णत: विझवली. आग विझविण्यासाठी कडुनिंबाच्या झाडाच्या फांद्या तसेच पोत्याच्या वापर केला.
आग विझल्यानंतर येवला व मनमाड नगरपालिकेचे फायर ब्रिग्रेडचे दोन पाण्याचे बंब घटनास्थळी दाखल झाले. बंब उशिराने पोहोचण्याचा प्रकार यापूर्वीही घडल्याची खंत रायपूर वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष खंडेराव गुंजाळ यांनी व्यक्त केली.
नुकत्याच लागवड केलेल्या जंगली झाडांना आगीपासून धोका होऊ नये यासाठी रायपूर येथील खंडेराव गुंजाळ ,मारु ती मोरे,बाळू सोनवणे,शिवाजी कदम ,वैभव कासव, अशोक बंदरे यांनी वनविभागाची कुमक येण्यापूर्वीच शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले. जंगल ही राष्ट्रीय संपत्ती असून अशी कामे निस्वार्थी भावनेतून करावी. याबाबत स्थानिकानी केलेल्या कामगिरीची प्रशंसा वनरक्षक एन.एस.बिन्नर यांनी केली.
आग विझविण्यासाठी रायपूर येथील वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष खंडेराव गुंजाळ, वनपरिक्षेत्र अधिकारी संजय पवार,विलास ताटपुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली एस.के.खंदारे,भास्कर डुकरे, नामदेव पवार, भारत वाघ,दयानंद कासव,अशोक शिंदे, अशोक आहेर,केदू वानखेडे, साहेबराव गांगुर्डे, मारु ती मोरे यांनी परिश्रम घेतले.