पावसाच्या हलक्या सरींचा वर्षाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 00:33 IST2018-07-09T00:33:27+5:302018-07-09T00:33:43+5:30
नाशिक : शहर व परिसरात रविवारी (दि.८) दिवसभर ढगाळ हवामान होते. दुपारनंतर काही भागात सूर्यदर्शनही घडले. मात्र सकाळपासून दुपारी तीन वाजेच्या दरम्यान उपनगरांमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.

पावसाच्या हलक्या सरींचा वर्षाव
नाशिक : शहर व परिसरात रविवारी (दि.८) दिवसभर ढगाळ हवामान होते. दुपारनंतर काही भागात सूर्यदर्शनही घडले. मात्र सकाळपासून दुपारी तीन वाजेच्या दरम्यान उपनगरांमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.
दुपारी बारा वाजेनंतर सिडको, पाथर्डी, अंबड, इंदिरानगर, वडाळागाव, डीजीपीनगर, अशोकामार्ग, मुंबई नाका या भागात पावसाच्या हलक्या सरींचा शिडकावा झाला. मुंबईसह कोकणात जोरदार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली असताना हवामान खात्याने उत्तर महाराष्टÑातही येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे; मात्र नाशिककरांसाठी मागील काही दिवसांप्रमाणे रविवारही कोरडाठाक गेला. शहरावर ढग दाटून येत असले तरी पावसाच्या दमदार सरी कोसळत नसल्याने नाशिककरांच्या पदरी अद्याप निराशाच असून, काहीशी चिंताही लागली आहे.