सटाण्यात इनरव्हील क्लबच्या वतीने रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 19:32 IST2019-07-24T19:32:19+5:302019-07-24T19:32:54+5:30
सटाणा : बागलाण तालुक्यातील पाण्याची भीषणता, दुष्काळाची दाहकता लक्षात घेऊन घराच्या छतावरील वाहून जाणारे पावसाचे पाणी एका ठिकाणी आणून विंधन विहिरींचे पुनर्भरण करण्यासाठी इनरव्हील क्लब आॅफ सटाणा मिड टाऊनच्या वतीने शहरात रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रकल्प राबविण्याचा स्तुत्य उपक्र म सुरु केला आहे.

सटाणा येथील इनरव्हील क्लबच्या वतीने शहरात शहरात रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या उपक्र माचा प्रारंभ करतांना क्लबच्या अध्यक्षा स्मिता येवला, सेक्र ेटरी रु पाली जाधव समवेत रु पाली कोठावदे, सुजाता पाठक, साधना पाटील, अर्चना सोनवणे, सुनिता धोंडगे आदी.
सटाणा : बागलाण तालुक्यातील पाण्याची भीषणता, दुष्काळाची दाहकता लक्षात घेऊन घराच्या छतावरील वाहून जाणारे पावसाचे पाणी एका ठिकाणी आणून विंधन विहिरींचे पुनर्भरण करण्यासाठी इनरव्हील क्लब आॅफ सटाणा मिड टाऊनच्या वतीने शहरात रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रकल्प राबविण्याचा स्तुत्य उपक्र म सुरु केला आहे.
शहरात सिमेंटच्या बंगल्यामुळे पावसाळ्यात छतावरील पावसाचे पाणी मोठ्याप्रमाणात वाहून जाते. परिणामी ते पाणी साचून डासांचा उपद्रव वाढून हिवतापा सारखे आजार पसरतात .त्यामुळे वाहून जाणारे पाणी वापरासाठी विहीर पुनर्भरण हाच एकमेव उपाय आहे. त्यासाठी इनरव्हील क्लबच्या सभासदांना सरोज चंदात्रे रेन वॉटर हार्वेस्टिंग बाबत मार्गदर्शन केले. क्लबच्या माजी अध्यक्षा रु पाली कोठावदे यांनी आपल्या राहत्या घरी स्वखर्चानें रेन वॉटर हार्वेस्टिंग करून घेतले. क्लबच्या वतीने शहरात जनजागृती मोहीम राबवून रेन वाटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यावेळी अध्यक्षा स्मिता येवला यांनी या प्रकल्पाबाबत आपली भूमिका विषद केली. या स्तुत्य उपक्र माची संकल्पना आमलात आणणार्या अध्यक्षा आण िसेक्र ेटरी रु पाली जाधव यांचा कोठावदे कुटुंबीयांकडून गौरव करण्यात आला. कार्यक्र माच्या यशस्वीतेसाठी आरके ट्रेडिंगचे संचालक श्रीधर कोठावदे यांनी मोलाचे सहकार्य केले. नयना कोठावदे, अर्चना सोनवणे, साधना पाटील, पुनम अंधारे, सुनीता धोंडगे, सुजाता पाठक आदी क्लब सदस्या उपस्थित होत्या. क्लब मधील काही सदस्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याचा संकल्प केला. सेक्र ेटरी रु पाली जाधव यांनी आभारप्रदर्शन केले.