पूलाच्या अर्धवट कामामुळे पावसाचे पाणी शेतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 01:36 IST2020-06-13T20:48:58+5:302020-06-14T01:36:02+5:30
चांदोरी : येथील चांदोरी-ओझर रस्त्यालगत होत असलेल्या पुलाचे काम पूर्ण न झाल्याने पावसाचे पाणी जाण्यास जागा नसल्याने पाणी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात शिरल्याने शेतीचे नुकसान झाले आहे.

पूलाच्या अर्धवट कामामुळे पावसाचे पाणी शेतात
चांदोरी : येथील चांदोरी-ओझर रस्त्यालगत होत असलेल्या पुलाचे काम पूर्ण न झाल्याने पावसाचे पाणी जाण्यास जागा नसल्याने पाणी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात शिरल्याने शेतीचे नुकसान झाले आहे.
शुक्र वारी (दि.१२) नाशिक शहरासह सय्यद पिंपरी, आडगाव या गावात पाऊस झाल्याने चारी, ओहोळ, नाले दुथडी भरून वाहू लागले. त्यामुळे ते पाणी वाहत थेट चांदोरी शिवारात आले, मात्र चांदोरी-खेरवाडी रस्त्यालगतच्या टर्ले वस्ती येथे पुलाचे काम अपूर्ण असल्याने पाणी जाण्यास जागा नसल्याने ते पाणी शेतात शिरले. एक वर्षापासून पुलाचे काम सुरू आहे. पुलाचे काम सुरू असताना वाहतूक सुरळीत राहण्यासाठी पर्यायी रस्ता तयार करण्यात आला होता, मात्र पाणी जाण्यासाठी पाइप न टाकल्याने ते जवळ असलेल्या शेतात शिरल्याने शेत पिकांचे नुकसान झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात शेतकºयांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. शेतकºयांनी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.