शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

निफाड तालुक्यात रिमझिम पाऊस, द्राक्ष पंढरीत उत्पादक धास्तावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 11:42 IST

या वातावरणात शेतमाल खराब होण्याची शक्यता जास्त आहे. दुसरीकडे द्राक्षांचे मनी तयार होण्याचा हा कालावधी असल्यामुळे खराब हवामानाचा विपरीत परिणाम द्राक्षांवर होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा द्राक्ष पंढरीत द्राक्षबागांना फटका बसण्याची शक्यता आहे.

नाशिक- अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असल्याने पुढील दोन दिवस पावसाचे असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आज सकाळ पासून द्राक्ष पंढरी म्हणून ओळख असणाऱ्या निफाड तालुक्यातील बहुतांशी भागात रिमझिम पावसाला सुरवात झाली आहे. यामुळे आता, अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान होण्याच्या भीतीने बळीराजा धास्तावला आहे.

सकाळपासूनच वातावरणात अमुलाग्र बदल झालेला बघायला मिळत आहे. एकीकडे थंडीचा घसरलेला पारा त्यातच वाऱ्याचा वेगही वाढलेला आहे. दुसरीकडे अचानक सकाळी नऊ वाजेच्या सुमारस पावसाच्या सरी कोसळल्यामुळे द्राक्षउत्पादकांसह कांदा उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत.

या वातावरणात शेतमाल खराब होण्याची शक्यता जास्त आहे. दुसरीकडे द्राक्षांचे मनी तयार होण्याचा हा कालावधी असल्यामुळे खराब हवामानाचा विपरीत परिणाम द्राक्षांवर होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा द्राक्ष पंढरीत द्राक्षबागांना फटका बसण्याची शक्यता आहे.

पंधरा दिवसापूर्वी ढगाळ वातावरणासह पावसाने हजेरी लावली होती. तेव्हा  अतोनात नुकसान झाले होते. द्राक्ष बागाची कूज आणि गळ मोठ्या प्रमाणावर झालेली होती. त्यातून शेतकरी सावरतो तोच पुन्हा एकदा  पाऊस आणि ढगाळ हवामान यामुळे शेतकरी पुरता मेटाकुटीला आला आहे.  द्राक्ष आणि कांदा पिकावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. काढणीला आलेला कांदा जमिनीत खराब होऊ शकतो तर द्राक्ष मण्यांना तडे, भुरी, डाऊनी, गळ, कूज,  या समस्या निर्माण होऊ शकतात. लाखो रुपये खर्च करून हाताशी आलेले पीक वाया जाण्याच्या भीतीने शेतकऱ्यांची झोप उडवली आहे.

टॅग्स :RainपाऊसNashikनाशिकFarmerशेतकरी