नाशिक जिल्ह्यात पावसाचा दणका; पिकांवर रोगराईचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:20 IST2021-08-20T04:20:13+5:302021-08-20T04:20:13+5:30
जिल्ह्यात काही तालुक्यात साधारणत: महिनाभराच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावली. पावसाअभावी मका, सोयाबीन, बाजरी, कांदा रोपे आदी पिके धोक्यात आली ...

नाशिक जिल्ह्यात पावसाचा दणका; पिकांवर रोगराईचे सावट
जिल्ह्यात काही तालुक्यात साधारणत: महिनाभराच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावली. पावसाअभावी मका, सोयाबीन, बाजरी, कांदा रोपे आदी पिके धोक्यात आली होती. गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असणाऱ्या या रिमझिम पावसाने तग धरून राहिलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. तर, कांदारोपे लागणीला आली असताना सततच्या पावसाने रोपे खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबरोबरच मूग, सोयाबीन, मका, बाजरी आदी पिकांचे उत्पन्न घटणार असून, नुकसान होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. सततच्या पावसाने जनावरे आजारी पडण्याचे प्रमाणदेखील वाढते आहे. दरम्यान, दोन दिवसांपासून संततधारेमुळे सुरगाणा तालुक्यातील नार नदीला आलेल्या पुरात तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भागातील खिर्डी भाटीचा खिरपाडा येथील रामजू प्रधान कुवर (६५) हे नदीच्या प्रवाहात वाहून गेले. त्यांचा मृतदेह दि.१७ रोजी हाती लागला. नांदगाव येथेही शाखांबरी नदीला पूर आला आहे, तर मालेगाव येथे संततधारेमुळे खरिपाच्या पिकांना जीवदान मिळून नद्या-नाले भरून वाहू लागले आहेत.