पड रं पाण्या, पड रं पाण्या, कर पाणी पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 02:26 IST2020-07-13T20:40:58+5:302020-07-14T02:26:16+5:30
सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागात यंदा पहिल्यांदाच जून अखेरीस पेरण्यांची कामे उरकली आहेत. मृगाच्या दमदार पावसाने पिकांची उगवन जोरदार झाली असली तरी पावसाने ओढ दिल्याने या पिकांना आता वरुणराजाची ओढ लागली आहे.

पड रं पाण्या, पड रं पाण्या, कर पाणी पाणी
सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागात यंदा पहिल्यांदाच जून अखेरीस पेरण्यांची कामे उरकली आहेत. मृगाच्या दमदार पावसाने पिकांची उगवन जोरदार झाली असली तरी पावसाने ओढ दिल्याने या पिकांना आता वरुणराजाची ओढ लागली आहे.
पिकांना पाण्याचा ताण पडत असल्याने पुर्व भागातील बळीराजा येथील येरे येरे पावसा म्हणत अर्जव करताना दिसतो आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे मान्सूनची वेळेआधीच वाटचाल सुरू झाली. दुष्काळी म्हणून गणल्या जाणाऱ्या सिन्नरच्या पूर्व भागात जूनच्या पहिल्याच आठवड्यात जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे खरिपाच्या पेरण्यानीदेखील वेग घेतला.
शेतकऱ्यांना बांधावर खतांचे वाटप
पाथरे : जामनदी फार्मर प्रोडूसर कंपनीच्या वतीने पाथरे येथील शेतकरी सभासदांना थेट बांधावर युरिया खताचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष मच्छिंद्र चिने, संचालक नारायण शिंदे, वारेगावचे सरपंच मिननाथ माळी यांचेसह शेतकरी सभासद उपस्थित होते. ना नफा ना तोटा या तत्वाने केवळ शेतकºयांच्या हितासाठी स्थापन करण्यात आलेल्या या कंपनीने आज सर्वत्र युरिया खताची टंचाई निर्माण झाली असताना हा उपक्रम राबवला. ज्या सभासद शेतकºयांनी संस्थेकडे खताची मागणी नोंदविली होती त्या शेतकºयांच्या बांधावर रास्त किमतीत युरिया खत पोहोच करण्यात आले. गत चार वर्षांपासून शेतकरी हिताच्या दृष्टीने अनेक उपक्रम राबवणाºया या संस्थेने डाळिंब, भाजीपाला, कांदा आदी शेतमालाची रास्त भावात खरेदी करून विक्री केली आहे. कंपनीमार्फत शेतकºयांना खात्रीशीर बियाणे, औषधे उपलब्ध करून दिली जातात. शेतकरी ते ग्राहक या तत्त्वाने संस्था कार्य करत असून वावी येथे शेतीसाठी आवश्यक असणाºया खते, बी - बियाणे, अवजारांचे विक्री केंद्र सुरु करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष मच्छिंद्र चिने यांनी दिली.
---------------------
कमी-अधिक प्रमाणात पावसाचा जोर राहिल्याने पिकांसाठी अनुकूल परिस्थिती राहिली. मात्र, ऊन सावल्यांचा खेळात पिकांना पाण्याची गरज असल्याने आता येरे येरे पावसा मांडण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. अनेक भागात शेतकºयांनी पिकांना युरियाचा पहिला डोस दिला आहे. तर असंख्य शेतकºयांनी युरियाची खरेदी करून ठेवली आहे.
-----------
पाऊस नसल्याने खतांची ही मात्रा वापरतात येत नसल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे. सध्यस्थितीत पिकांना खतांची मात्रा मिळाली तर पुढच्या पावसात पिके बहरतील अशी आस आहे.
---------------
कारण पुढच्या काळात श्रावण महिना सुरू झाल्यानंतर पूर्वभागात जेमतेम पडणाºया पावसावर पिकांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. पिके वाढीच्या काळात पाण्याचा ताण बसला तर त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होणार आहे. अनेक भागात मका, सोयाबीन वर किडीचे अस्तित्व जाणवत आहे. पावसाची वाट बघावी लागत आहे.