देवगांव परिसरात पावसाच्या सरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:14 IST2021-09-13T04:14:04+5:302021-09-13T04:14:04+5:30

पूर्वा नक्षत्राचा आजचा शेवटचा दिवस असल्याने पावसाची रिपरिप कायम आहे. मात्र, उद्यापासून सूर्याचा उत्तरा नक्षत्रात प्रवेश होणार असून, पाऊस ...

Rain showers in Devgaon area | देवगांव परिसरात पावसाच्या सरी

देवगांव परिसरात पावसाच्या सरी

पूर्वा नक्षत्राचा आजचा शेवटचा दिवस असल्याने पावसाची रिपरिप कायम आहे. मात्र, उद्यापासून सूर्याचा उत्तरा नक्षत्रात प्रवेश होणार असून, पाऊस काहीसा मंदावणार असल्याची शक्यता आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाची टक्केवारी कमी आहे. यावर्षी फक्त पुष्य आणि पूर्वा ह्या दोनच नक्षत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नदी-नाले, ओहोळ तुडुंब भरून वाहू लागले. मात्र, धरण क्षेत्रातील पाणीसाठा व धरणाची पातळी अद्यापही पूर्ण झालेली नाही. गेल्यावर्षी वैतरणा धरण ओव्हर फ्लो होऊन तुडुंब भरून वाहत होते. मात्र, यावर्षी धरण क्षेत्राची पातळी अजून शिल्लक आहे.

दि. १० सप्टेंबर रोजी गणपती आगमनापासून देवगांवसह वावीहर्ष, टाकेदेवगाव, श्रीघाट, चंद्राचीमेट, आदी गावांमध्ये पावसाचा जोर कायम आहे. संततधार आणि मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे हवेत गारवा आला असून, सर्दी, खोकल्याने डोके वर काढले आहे. नोकर-चाकर प्रवाशांना संततधार पावसामुळे खोळंबा झाला असून, घडीभर पावसाची उघडीप मिळावी व मिळालेल्या उसंतीत कामे उरकण्याची लगबग करीत धांदल उडाली आहे.

Web Title: Rain showers in Devgaon area