साकोरा परिसरात पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 17:32 IST2018-10-25T17:31:48+5:302018-10-25T17:32:17+5:30
साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा परिसरात यावर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने बळीराजा हतबल झाला असतांना गुरुवारी (दि.२५) दुपारी चार साडेचार वाजेच्या दरम्यान अचानक ढग दाटून आले आणि साकोरा येथे वीस मिनिटे बरसला.

साकोरा परिसरात पाऊस
ठळक मुद्देअवघ्या काही वेळातच पाणी जमिनीत गायब झाले.
साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा परिसरात यावर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने बळीराजा हतबल झाला असतांना गुरुवारी (दि.२५) दुपारी चार साडेचार वाजेच्या दरम्यान अचानक ढग दाटून आले आणि साकोरा येथे वीस मिनिटे बरसला.
तर जामदरी फाटा, जामदरी गावात तसेच तळवाडे शिवारात पाऊन तास पाऊस झाला.त्यानंतर पुन्हा एक तासानंतर पाऊस झाला.मात्र जमिनीची इतकी मोठी तहान असल्याने अवघ्या काही वेळातच पाणी जमिनीत गायब झाले.