पावसाची उघडीप

By Admin | Updated: August 24, 2014 00:44 IST2014-08-23T22:34:10+5:302014-08-24T00:44:32+5:30

जोरदार हजेरीनंतर पावसाची उघडीप दिवसभरात २११ मिलिमीटरची नोंद

Rain open | पावसाची उघडीप

पावसाची उघडीप

  नाशिक : शुक्रवारी (दि.२२) दीड तास जोरदार हजेरी लावणाऱ्या पावसाने शनिवारी (दि.२३) दिवसभर उघडीप घेतल्याचे चित्र होते. दुपारी तर कडकडीत ऊन पडले. सायंकाळी मात्र पुन्हा काही प्रमाणात पावसाने हजेरी लावल्याचे चित्र होते. शुक्रवारी झालेल्या पावसाने मात्र चांदवड, देवळा, नांदगाव व येवला या दुष्काळी तालुक्यातही जोरदार हजेरी लावली. शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत पावसाची तालुकानिहाय घेण्यात आलेली मिलिमीटरमध्ये आकडेवारी पुढीलप्रमाणे- नाशिक- १७.२, इगतपुरी-१२, दिंडोरी-२०, पेठ-१०, त्र्यंबकेश्वर-८, मालेगाव-९, नांदगाव-१७.५, चांदवड- ३३.४, कळवण-४.४, बागलाण-१७.४, सुरगाणा-१.८, देवळा-२७, निफाड-४, सिन्नर-१५, येवला-१५ असा एकूण २११.७ मिलिमीटर पावसाची जिल्'ात नोंद करण्यात आली आहे. जिल्'ात यापूर्वीच मालेगाव, नांदगाव, येवला व देवळा तालुके दुष्काळी जाहीर करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात पन्नास टक्क्यापेक्षा कमी पावसाची सरासरी असलेल्या सिन्नर, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, चांदवड या तालुक्यांत अत्यल्प पाऊस होता. शुक्रवारी झालेल्या पावसाने नांदगाव, येवला, सिन्नरसह चांदवड या तालुक्यात जोरदार हजेरी लावल्याने या तालुक्यातील शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Rain open