पावसाची उघडीप
By Admin | Updated: May 30, 2014 01:05 IST2014-05-30T00:12:05+5:302014-05-30T01:05:24+5:30
दोन दिवसांत ३४.३ मि.मी. पाऊस

पावसाची उघडीप
दोन दिवसांत ३४.३ मि.मी. पाऊस
नाशिक : शहरासह जिल्ात गेल्या दोन दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस झाल्यानंतर आज उघडीप दिली. दरम्यान, गेल्या दोन दिवसांत सुमारे ३४.३ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, येत्या काही दिवसांत पावसाच्या तुरळक सरींचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रात जूनच्या मध्यात मान्सूनचा पाऊस धडकणार असला, तरी त्यापूर्वीच रोहिणी नक्षत्रातील मान्सूनपूर्व पावसाने गेल्या दोन दिवसांपासून जिल्ाला झोडपून काढले. वादळी वार्यासह गारपिटीने शेतीचे नुकसान झाले, तर अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने वाहनांचेही नुकसान झाले.
दरम्यान, गुरुवारी पावसाने उघडीप दिली; मात्र दिवसभर उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसाने वृक्ष उन्मळून पडल्याच्या खाणाखुणा आजही दिसत होत्या. अग्निशमन दलाच्या विभागाने शहरात उन्मळून पडलेली झाडे हटवून रस्ते वाहतुकीला मोकळे केले, तर महापालिकेच्या ठेकेदारांनी मोडून पडलेल्या वृक्षांच्या फांद्या बाजूला केल्या. गेले दोन दिवस दुपारच्या सुमारास रोहिणी नक्षत्रातील पावसाने वादळी वारा अन् विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली होती. यात अनेक घरांचे पत्रे उडून गेले, तर काही घरांच्या भिंतींचीही पडझड होऊन संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले.