पंचवटी : जागोजागी साचलेले कचºयाचे ढीग, वाढलेले गाजर गवत, पावसामुळे स्लॅबमधून टपकणारे पावसाचे पाणी, फुटलेल्या ड्रेनेजमधून वाहणारे दुर्गंधीयुक्त पाणी, इमारतीचे मोडकळीस आलेले सज्जे तसेच मोकाट प्राण्यांचा उपद्रव, ओस पडलेल्या इमारती, मद्यपींचा सुळसुळाट अशा एक ना अनेक समस्यांनी सध्या दिंडोरीरोडवर असलेली मेरी शासकीय वसाहत समस्यांच्या विळख्यात सापडली आहे.इमारतीत राहणाºया नागरिकांनी तक्रार केल्यानंतर तत्काळ दखल घेतली जात नसल्याने व साधन सामग्री शिल्लक नसल्याचे उत्तर मिळत असल्याने दुरुस्ती काम स्वत:च करून घ्यावे लागते. मेरी वसाहतीत जवळपास ५० हून अधिक कुटुंब राहत असले तरी राहणाºया कुटुंबीयांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना, महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रबोधिनी तसेच सार्वजनिक अभियांत्रिकी संशोधन संस्था शासकीय कार्यालयात काम करणाºया अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निवासस्थान म्हणून शासनाने चाळीस ते पंचेचाळीस वर्षांपूर्वी वसाहत निर्मिती केली होती. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून इमारतीत राहणारे कर्मचारी अन्यत्र स्थलांतरित झाल्याने निम्म्याहून अधिक इमारती सध्या ओस पडल्या आहे.काही मोजक्याच इमारतीत अगदी बोटावर मोजण्या इतके कुटुंब तसेच राज्य सरकारी कर्मचारी राहतात त्यांनाही इमारत दुरुस्तीची प्रतीक्षा करावी लागत आहे. मेरीच्या शासकीय वसाहतीत पन्नास पेक्षा अधिक इमारती आहे केवळ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सर्वच इमारतींची दुर्दशा झाल्याने त्यांची अवस्था पुरातन खंडर सारखी झाली आहे.
मेरी वसाहतीला पावसाची गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 00:12 IST
जागोजागी साचलेले कचºयाचे ढीग, वाढलेले गाजर गवत, पावसामुळे स्लॅबमधून टपकणारे पावसाचे पाणी, फुटलेल्या ड्रेनेजमधून वाहणारे दुर्गंधीयुक्त पाणी, इमारतीचे मोडकळीस आलेले सज्जे तसेच मोकाट प्राण्यांचा उपद्रव, ओस पडलेल्या इमारती, मद्यपींचा सुळसुळाट अशा एक ना अनेक समस्यांनी सध्या दिंडोरीरोडवर असलेली मेरी शासकीय वसाहत समस्यांच्या विळख्यात सापडली आहे.
मेरी वसाहतीला पावसाची गळती
ठळक मुद्देसमस्यांचा विळखा : ओस घरांमध्ये टवाळखोरांचा अड्डा, कचऱ्याचे ढीग,नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष