शहरात पावसाची सलग हजेरी
By Admin | Updated: June 13, 2017 01:36 IST2017-06-13T01:36:08+5:302017-06-13T01:36:30+5:30
शहरात पावसाची सलग हजेरी

शहरात पावसाची सलग हजेरी
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : पाच दिवसांनंतर रविवारी प्रथम शहरात दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यानंतर सोमवारी (दि. १२) संध्याकाळी पावसाने नाशिककरांना दिलासा दिला. सकाळपासून नागरिक ढगाळ हवामानामुळे व वाढत्या उकाड्याने हैराण झाले होते.
रविवारी शहरात दीड तासात २६ मि.मी. पाऊस झाला होता, तर सोमवारी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत हवामान खात्याने चार मि.मी. पावसाची नोंद केली असली तरी साडेपाच वाजेनंतर पावसाचा शहरात जोर वाढला होता. साडेसहा वाजेपर्यंत पाऊस सुरू होता. त्यामुळे बारा तासांच्या पर्जन्यमानात जरी कमी पावसाची नोंद झाली असली तरी मंगळवारी (दि. १३) सकाळी साडेआठ वाजता पुन्हा हवामान खात्याकडून २४ तासांचे पर्जन्यमानाचे निरीक्षण नोंदविले जाईल तेव्हा पावसाचा आकडेवारी वाढेल.विभागात सरासरी ९.७ टक्के पाऊस
नाशिकरोड : नाशिक विभागामध्ये गेल्या १२ दिवसांत सरासरी ९.७ टक्के पाऊस पडला असून, सर्वाधिक पाऊस अहमदनगर जिल्ह्यात झाल्याची नोंद करण्यात आली आहे. राज्य शासनाकडून १ जूनपासून सप्टेंबर अखेरपर्यंत पावसाळा ऋतू समजला जातो.