शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

डिसेंबरमध्ये पाऊस, होय हे माझं सरकार....!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 2:33 PM

ओखी वादळामुळे नाशिक जिल्ह्यातील हवामानावरही परिणाम झाला असून, मंगळवारी सकाळपासून पावसाने सर्वत्र हजेरी लावल्याने त्याचा धागा

ठळक मुद्देओखी वादळातही नेटीझन्सने साधली मनोरंजनाची पर्वणी‘आम्ही शाळेत असताना ही वादळं कुठ मेलेली काय माहित??’

नाशिक : ओखी चक्रीवादळाने सर्वत्र हा:हाकार उडून मानवी आरोग्यास तसेच शेती पिकांना मोठ्या प्रमाणावर नुकसानीस सामोरे जावे लागत असताना अशा परिस्थितीतही नेटीझन्सने सोशल मिडीयाचा आधार घेत, आपल्यातील कलागुणांना वाव देण्याची संधी सोडली नाही, अगदी या चक्रीवादळाला सरकार जबाबदार असल्याचा निष्कर्ष काढण्यापासून ते एकमेकांची खिल्ली उडवून मनोरंजनाची पर्वणी साधली आहे.ओखी वादळामुळे नाशिक जिल्ह्यातील हवामानावरही परिणाम झाला असून, मंगळवारी सकाळपासून पावसाने सर्वत्र हजेरी लावल्याने त्याचा धागा पकडून ‘आम्ही शाळेत असताना ही वादळं कुठ मेलेली काय माहित??’ असा प्रश्न विचारून ‘पुर्वीच्या पिढीपेक्षा आताची पिढी जास्त पावसाळे पाहतेय’ असे नमूद करून अनेक पावसाळे पाहिलेल्यांना एक प्रकारे खिजविण्यात आले आहे. ‘कुणाची पावसाळी पिकनिक राहिली असेल तर उरकून घ्या पटकन...तो परत आलाय’ असे नमूद करतांनाच, कवींची खिल्ली उडवितांना, ‘कुणाच्या पावसाच्या कविता टाकायच्या राहिल्या असतील तर टाकून घ्या पटकन...तो आलाय परत’ असे म्हटले आहे. पावसाला उद्देशून ‘ प्रिय पाऊस, परत एकदा वांदे नको करूस... काय ते एकदाच सांग.. स्वेटर घालू की रेनकोट?’ खवय्यांना पर्वणी म्हणून ‘खेडके पण कन्फूज आहेत, परत जून महिना आला की काय’ अशी कोटी करण्यात आली आहे. सोशल माध्यम म्हटले तर पुण्याची आठवण येत नाही असे होतच नाही, ओखीच्या निमित्ताने ‘आमच्याकडे स्वेटरला प्लॉस्टिक लाऊन मिळेल- लेले होजिअरी, सदाशिव पेठ पुणे’ असे नमूद करून पुणेकरांची खोड काढण्यात आली आहे.वादळाच्या निमित्ताने सरकारवर टिका करण्याची संधीही राजकारण्यांनी सोडली नाही, ‘च्या मायला पुन्हा पावसाळा आला, आता दिवाळी येणार..परत बोनस, होय हे माझं सरकार, आम्ही लाभार्थी !’ याच बरोबरच ‘याच्या अगोदर मला डिसेंबरमधी कधीच पाऊस बघायला नाय भेटला... पण या वर्षी डिसेंबरमधी पाऊस बघायला भेटला...होय हे माझ सरकार...मी लाभार्थी ! यावर सत्ताधारी पक्षाने देखील संधी सोडली नाही, ‘आज फिर आके बारिस ने किचड कर दिया, लगता है ‘कमल’ खिलने का इशारा कर दिया’ असे सांगून विरोधकांना मुंहतोड उत्तर दिले आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलNashikनाशिक