नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून पाण्याचा गोदापात्रात विसर्ग सुरूच आहे. मागील दोन दिवसांपासून गंगापूर धरण समुहाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्याने धरणात पाण्याची आवक जास्त होत आहे. त्यामुळे धरण ९२.७५ टक्के भरले असून दीड हजारावरुन विसर्ग वाढविण्यात आला आहे. सध्या गोदापात्रात सोमवारी संध्याकाळपर्यंत २ हजार ८० क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू होता.पावसाच्या दमदार सरींचा शहरासह जिल्ह्यात जोरदार वर्षाव सुरू आहे. शहरात मागील तीन दिवसांपासून काही मिनिटे ‘ब्रेक’ घेत वर्षा सरीं नाशिककरांना चिंब करत आहे. पाच ते सात मिनिटांपर्यंत दमदार सरींचा वर्षाव झाल्यानंतर पुन्हा उघडीप आणि सुर्यकिरणेही तितक्याच वेगाने पडत असल्याचा नाशिककर सध्या अनुभव घेत आहे. दिवसभरात सकाळ, दुपार, संध्याकाळी पावसाची हजेरी कायम आहे. दिवसाच्या तीन प्रहरात पाऊस अल्पशी विश्रांती घेत अल्पवेळ दमदार हजेरी लावून नाशिककरांना भिजवत आहे. मागील २४ तासांमध्ये आज सकाळी साडे आठ वाजेपर्यंत शहरात ११ मिमी पाऊस पडल्याची नोंद हवामान खात्याने केली आहे. तसेच गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १४ मि.मी इतका पाऊस पडला. अद्याप या हंगामात ५५७ मि.मी इतका पाऊस शहरात झाला आहे. रविवारी (दि.२६) दिवसभरात १.६ मि.मी, शनिवारी (दि.२५) २ मि.मी., शुक्रवारी १.१ मि.मी., गुरूवारी १.३ मि.मी इतका पाऊस पडला. पावसाचे प्रमाणा मागील बुधवारपासून कमी झाले असले तरी रविवारी सकाळपासून सोमवारी सकाळपर्यंत २४ तासांत ११ मि.मी पावसाची नोंद झाली. दिवसभरात अवघा १.६ मि.मी पाऊस रविवारी झाला असला तरी रात्री दहा वाजेनंतर पहाटेपर्यंत पावसाने जोरदार हजेरी लावल्याने आज सकाळी आठवाजेपर्यंत ११ मि.मी पावसाची नोंद होऊ शकली.
पाणलोट क्षेत्रात पाऊस : गंगापूर धरणातून विसर्ग सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 17:34 IST
पावसाच्या दमदार सरींचा शहरासह जिल्ह्यात जोरदार वर्षाव सुरू आहे. शहरात मागील तीन दिवसांपासून काही मिनिटे ‘ब्रेक’ घेत वर्षा सरीं नाशिककरांना चिंब करत आहे. पाच ते सात मिनिटांपर्यंत दमदार सरींचा वर्षाव झाल्यानंतर पुन्हा उघडीप आणि सुर्यकिरणेही तितक्याच वेगाने पडत असल्याचा नाशिककर सध्या अनुभव घेत आहे.
पाणलोट क्षेत्रात पाऊस : गंगापूर धरणातून विसर्ग सुरूच
ठळक मुद्देदिवसाच्या तीन प्रहरात पाऊस आज सकाळी साडे आठ वाजेपर्यंत शहरात ११ मिमी पाऊस पडल्याची नोंद गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १४ मि.मी इतका पाऊस