शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 01:03 IST

नाशिकरोड : मुंबई-हावडा एक्स्प्रेस इगतपुरीनजीक रुळावरून घसरल्याने रेल्वेसेवा विस्कळीत झाल्याने नागरिकांचे हाल झाले. नाशिकहून मुंबईकडे जाणाºया पंचवटी, राज्यराणी तसेच गोदावरी एक्स्प्रेस या गाड्या रविवारी रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांचे वेळापत्रक कोलमडले.

ठळक मुद्देहावडा एक्स्प्रेसला अपघात नाशिकरोड स्थानकावर प्रवासी ताटकळले

इगतपुरीनजीक हावडा एक्स्प्रेसचे तीन डबे रूळावरून घसल्याने गाडीला अपघात झाला. या अपघातामुळे मुंबईहून सुटणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्याने नाशिकरोड रेल्वेस्थानकावर प्रवाशांची झालेली गर्दी.नाशिकरोड : मुंबई-हावडा एक्स्प्रेस इगतपुरीनजीक रुळावरून घसरल्याने रेल्वेसेवा विस्कळीत झाल्याने नागरिकांचे हाल झाले. नाशिकहून मुंबईकडे जाणाºया पंचवटी, राज्यराणी तसेच गोदावरी एक्स्प्रेस या गाड्या रविवारी रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांचे वेळापत्रक कोलमडले.रविवारी मध्यत्री मुंबई-हावडा एक्स्प्रेसचे तीन डबे इगतपुरी रेल्वे स्टेशनजवळ मध्यरात्री दोन वाजून पाच मिनिटांनी घसरल्याने या मार्गावरील रेल्वेसेवा विस्कळीत झाली. मध्यरात्री अपघात झाल्यामुळे प्रत्यक्ष बचावकार्य करण्यासाठी विलंब लागल्याने या मार्गावरून धावणाºया गाड्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली.अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे नोकरदार व्यावसायिकांची पंचवटी तसेच राज्यराणी, गोदावरी एक्स्प्रेस रद्द केल्याने या प्रवाशांचे हाल झाले. भुसावळ-मुंबई एक्स्प्रेस नाशिकरोडला येऊन माघारी गेली.अन्य रेल्वेगाड्यांनादेखील एक ते दहा तास उशीर झाल्याने प्रवाशांना स्थानकातच अडकडून पडावे लागले. जवळचा प्रवास असणाºया अनेकांनी एसटी व टॅक्सीने प्रवास करणे पसंत केले.रेल्वेसेवा विस्कळीत झाल्याने अनेक गाड्या रद्द झाल्या तर अनेक गाड्यांना मोठा विलंब झाला. प्रवासी विविध स्थानकांवर अडकून पडले. प्रवाशांना नाशिकरोड, मनमाड नाश्ता, तर भुसावळ रेल्वे स्थानकावर मोफत जेवण देण्यात आले. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला.पंचवटी एक्स्प्रेस रद्दनाशिक : मनमाडहून मुंबईकडे जाणारी पंचवटी तसेच गोदावरी, राज्यराणी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झाले. भुसावळ-पुणे ही पहाटे सव्वा पाचला नाशिकरोडला येणारी गाडी तीन तास उशिरा नाशिकरोडला पोहचली. मंगला एक्स्प्रेस तीन तास, तर हावडा मेल दोन, जनता एक्स्प्रेस पाच, महानगरी अडीच तास आणि सेवाग्राम तीन तास विलंबाने धावली. मुुंबईहून नाशिकच्या दिशेने येणाºया गाड्यांनाही विलंब झाला. रात्री १२ वाजता नाशिकरोडला येणारी कोलकाता एक्स्प्रेस रविवारी सकाळी साडेनऊला आली. कृषिनगरची नाशिकची वेळ रात्री अडीचची आहे. तथापि, ही गाडी सकाळी १० वाजता पोहचली. देवगिरी तब्बल दहा तास उशिराने धावली. काशी एक्स्प्रेला एक तास विलंब झाला. पुणे-दौंड-मनमाड मार्गे मुंबई-अमृतसर, लोकमान्य टिळक गुवाहटी, वाराणसी या गाड्या वळविण्यात आल्या-वसईरोड सुरत जळगावमार्गे पुढील गाड्या वळविण्यात आल्या.अशी घडली घटनारेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रात्रीच्या सुमारास मुंबईहून नाशिकच्या दिशेने निघालेल्या मुंबई-हावडा एक्स्प्रेस नाशिककडे येत असताना इगतपुरी स्टेशनजवळ इंजिनापासून नवव्या क्र माकांच्या डब्याची चाके पॅन्ट्री कारचे चाक व त्यानंतर असलेल्या कोच क्र मांक एस बाराची पुढील बाजूची चाके रेल्वे रुळावरून घसरली. त्यामुळे अप व डाउनची वाहतूक ठप्प झाली. बचाव कार्यासाठी मनमाड येथून विशेष गाडी इगतपुरीकडे रवाना झाली. त्यांनी सकाळी सहाच्या सुमारास कोच हटविले.

टॅग्स :railwayरेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासी