राखी पौर्णिमेमुळे रेल्वे आरक्षण फुल्ल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:18 IST2021-08-20T04:18:51+5:302021-08-20T04:18:51+5:30
गेल्या दीड वर्षापासून असलेला कोरोना संसर्गाचा उपद्रव बऱ्यापैकी आटोक्यात आल्याने सर्व व्यवहार, व्यवसाय व्यवस्थित सुरू झाले आहेत. यामुळे गेल्या ...

राखी पौर्णिमेमुळे रेल्वे आरक्षण फुल्ल !
गेल्या दीड वर्षापासून असलेला कोरोना संसर्गाचा उपद्रव बऱ्यापैकी आटोक्यात आल्याने सर्व व्यवहार, व्यवसाय व्यवस्थित सुरू झाले आहेत. यामुळे गेल्या दीड वर्षापासून विस्कटलेली सर्व घडी पूर्वपदावर येऊ लागली आहे. कोरोनामुळे गेल्यावर्षी सर्वांनाच कुठलेही सण, उत्सव नेहमीप्रमाणे साजरे करता आले नाहीत. मात्र, आता सर्व परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागल्याने सण, उत्सव साजरे करण्यासाठी नागरिक सहकुटुंब बाहेर पडू लागले आहेत. श्रावण मास हा सण व उत्सवाचा महिना असतो. अवघ्या चार दिवसांवर भावा-बहिणीचे नाते दृढ करणारा रक्षाबंधन सण आहे, तर आठ दिवसांवर हरतालिका सण आहे. रक्षाबंधननंतर मारवाडी समाज लहान तीज व मोठी तीज हा सण साजरा करतात. यामुळे सर्वच रेल्वेचे आरक्षण २५ ऑगस्टपर्यंत हाऊसफुल्ल झाले असून, वेटिंग लिस्ट चाळीसच्या वर गेली आहे.
------
५० टक्के प्रवासी संख्या वाढली
* पंचवटी, राज्यराणी, तपोवन, जनशताब्दी, सेवाग्राम, मंगला, राजधानी, मुंबई पटना, काशी, पवन, कामयानी, जनता मेल, हावडा एक्स्प्रेस, देवगिरी, मुंबई वाराणसी, महानगरी, पुष्पक या महत्त्वाच्या रेल्वे सुरू आहेत.
* सणानिमित्त बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्याही गेल्या काही दिवसांपासून वाढल्याने रेल्वेच्या उत्पन्नात वाढ होत आहे.
-----------
रेल्वे आरक्षण वेटिंग
काशी एक्स्प्रेसला स्लीपर १००- एसी ३०
सेवाग्राम एक्स्प्रेस स्लीपर ५०- एसी २५
जनशताब्दी एक्स्प्रेस स्लीपर ४५- एसी २०
पवन एक्स्प्रेस स्लीपर १००- एसी ३२