लोकमत न्युज नेटवर्कइगतपुरी : मध्य रेल्वेच्या झेड. आर. यु. सी. सी. सदस्यांची बैठक मध्य रेल्वेचे महाप्रबंधक संजीव मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील मध्य रेल्वेच्या मुख्यालयात झाली. सदर बैठकीत ‘नीर’ प्लांट व सरकता जिना दोन्ही मागण्या मंजूर देण्यात आली.समितीचे सदस्य महेश श्रीश्रीमाळ यांनी इगतपुरी रेल्वे स्थानक येथे सरकता जिना लावावा ही मागणी केली होती. काही महिन्यांपूर्वी इगतपुरी रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण झाले यावेळी पायऱ्याची उंची वाढविण्यात आली. परंतु यामुळे जेष्ठ नागरिक, दिव्यांग, गर्भवती स्त्रिया, आजारी व्यक्ती यांचे खुप हाल होत असल्याने हा त्रास दुर करण्यासाठी श्रीश्रीमाळ यांनी इगतपुरी रेल्वे स्थानक येथे फिरता जीना (एक्सलेटर) लावण्याची मागणी केली होती.सदर मागणी मंजुर करण्यात येऊन, उपमहाप्रबंधक दिनेश वशिष्ठ यांनी येत्या मार्च महिन्याच्या आत हे काम पूर्ण होईल असे आश्वासन दिले. तर दुसरी अत्यंत महत्वाची मागणी ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहणानुसार सिंगल युज प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी भारतीय रेल्वे देशात ६ ठिकाणी रेल्वेच्या निर या पिण्याच्या पाण्याच्या बायोडिग्रेडेबेल पॅकेजिंग या पर्यावरणाला पूरक अशा बाटलीचे प्लांट लावण्याच्या तयारीत आहे. त्यातील एक प्लांट इगतपुरी येथे लावावा या मागणीला देखील मान्यता देण्यात आली.सदर विषय हा आय. आर. सी. टी. सी. कडे पुढील कारवाईसाठी त्वरित वर्ग केला आहे. रेल्वेच्या ‘नीर’ या पिण्याच्या पाण्याच्या बायोडिग्रेडबल बाटलीचा प्लांट इगतपुरी शहरात लागल्यास इगतपुरी शहरात रोजगार निर्माण होईल व व्यापारवृद्धी होईल म्हणून इगतपुरी शहरातील नागरिकांमध्ये व व्यापाऱ्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.
रेल्वेचा ‘नीर’ प्लांट अन् सरकता जिना इगतपुरी शहरात लावण्यास मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 18:30 IST
इगतपुरी : मध्य रेल्वेच्या झेड. आर. यु. सी. सी. सदस्यांची बैठक मध्य रेल्वेचे महाप्रबंधक संजीव मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील मध्य रेल्वेच्या मुख्यालयात झाली. सदर बैठकीत ‘नीर’ प्लांट व सरकता जिना दोन्ही मागण्या मंजूर देण्यात आली.
रेल्वेचा ‘नीर’ प्लांट अन् सरकता जिना इगतपुरी शहरात लावण्यास मंजुरी
ठळक मुद्दे इगतपुरी शहरातील नागरिकांमध्ये व व्यापाऱ्यांमध्ये आनंद व्यक्त