शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गँगमनच्या सतर्कतेमुळे टळला रेल्वेचा अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 01:38 IST

थंडीची पर्वा न करता गस्त घालणाऱ्या गॅँगमनमुळे मध्य रेल्वेमार्गावरील संभाव्य अपघात टळल्याने प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

नाशिकरोड : थंडीची पर्वा न करता गस्त घालणाऱ्या गॅँगमनमुळे मध्य रेल्वेमार्गावरील संभाव्य अपघात टळल्याने प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले की, ट्रॅकमेंटनेर गणेश बोडके आणि निवृत्ती लोहकरे यांना घोटी-पाडळी स्टेशनच्या खांब नंबर १५२/२३ ते १५२/२५ या दरम्यान रुळाला तडे गेलेले आढळले. तर ट्रॅकमेन्टेर भगवान मेंगाळ आणि संतोष मोसे यांना इगतपुरी-घोटी सेक्शन कि.मी. खांब नंबर १४३/३१, १४४/१ या दरम्यान रु ळाला तडे गेलेले आढळले. त्यांनी वेळीच सदर प्रकार वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिला. गॅँगमन कडाक्याच्या थंडीतही रुळावर गस्त घालत असतात.इगतपुरी-घोटीदरम्यान रात्री दीडच्या सुमारास या गॅँगमनना रुळाला तडा गेलेला आढळला. या मार्गावरून मुंबई-एलटीटी राजेंद्रनगर एक्स्प्रेस जाणार होती. दुसºया ट्रॅकवरून मालगाडी घोटीकडे येत होती. त्या मार्गावरही रुळाला तडा गेल्याचे आढळले. या गाड्या तशाच पुढे गेल्या असत्या तर डबे रूळावर घसरून मोठी जीवित व वित्तहानी झाली असती. मध्य रेल्वेच्या इगतपुरी-घोटी मार्गादरम्यान मुंबई एलटीटी-राजेंद्रनगर जनता एक्स्प्रेसचा मोठा अपघात गॅँगमनच्या सतर्कतेमुळे टळला.सूत्रांनी सांगितले की, अप मार्गावर कसाºयाकडे जाताना घोटी-पाडळी भागात रुळाला पाच मिलीमीटर रूंदीचे तडे गेले होते, तर डाउन मार्गावर इगतपुरीकडे येताना घोटी-इगतपुरीदरम्यान रुळाला तडे गेले होते. गस्त घालताना गॅँगमनच्या दोन स्वतंत्र पथकांनी हे हेरले. त्यांनी कार्यालयाला कळविल्यावर उपाययोजना करण्यात आली. उपाययोजना केल्यावर जनता एक्स्प्रेस ही गाडी कमी वेगात पुढे गेली. भुसावळहून मुंबईकडे रात्री दीडच्या सुमारास मालगाडी जाणार होती. गस्त घालताना रुळाला तडे गेल्याचे लक्षात आल्यावर तात्पुरती उपाययोजना करण्यात आली. सकाळी दुरुस्ती करण्यात आली.

टॅग्स :Nashikनाशिकrailwayरेल्वेAccidentअपघात