लासलगावी गुरुवारी रेल रोको

By Admin | Updated: August 8, 2014 01:37 IST2014-08-08T00:29:07+5:302014-08-08T01:37:46+5:30

लासलगावी गुरुवारी रेल रोको

Rail Roko on Lasalagavi Thursday | लासलगावी गुरुवारी रेल रोको

लासलगावी गुरुवारी रेल रोको


लासलगाव : कांदा व बटाट्याला जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत टाकून मोदी सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय केला असून, याविरुद्ध आवाज उठविण्यासाठी येत्या गुरुवार (दि.१४) रोजी शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली लासलगावी रेल रोको करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष रामचंद्र बापू पाटील यांनी दिली. कांदा, बटाटा पीक जीवनावश्यक यादीतून वगळावे, कांदानिर्मितीवर कोणतेही बंधने नको, तसेच पिकांच्या उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी लासलगावी जोशी यांच्या नेतृत्वाखाली रेल रोको आंदोलन करणार आहेत. रेल रोकोपूर्वी बाजार समितीच्या जुन्या आवारात दुपारी १ वाजता शरद जोशी यांची सभा होणार आहे.

Web Title: Rail Roko on Lasalagavi Thursday