द्वारका परिसरातील जुगार अड्ड्यांवर छापे

By Admin | Updated: May 22, 2017 17:14 IST2017-05-22T17:14:22+5:302017-05-22T17:14:22+5:30

द्वारका परिसरातील एका इमारतीच्या आडोशाला सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर मुंबई नाका पोलिसांनी रविवारी (दि़२१) रात्रीच्या सुमारास छापा टाकला़

Raid on gambling bases in Dwarka area | द्वारका परिसरातील जुगार अड्ड्यांवर छापे

द्वारका परिसरातील जुगार अड्ड्यांवर छापे

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : द्वारका परिसरातील एका इमारतीच्या आडोशाला सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर मुंबई नाका पोलिसांनी रविवारी (दि़२१) रात्रीच्या सुमारास छापा टाकला़ यामध्ये जुगार खेळणाऱ्या चौघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़
मुंबई नाका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मानसी इमारतीच्या आडोशाला काही युवक जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास या ठिकाणी छापा टाकला असता संशयित यामीन जिलाणी शेख व तीन संशयित पत्यांवर अंदर बाहर नावाचा जुगार खेळत होते.
याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात संशयितांविरोधात मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: Raid on gambling bases in Dwarka area