शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
3
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
4
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
5
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
6
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
7
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
8
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
9
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
10
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
11
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
12
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
13
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
14
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
15
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
16
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
17
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार
18
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
19
समलिंगी मातेच्या जोडीदारालाही ‘पितृत्व रजा’!
20
‘सहकारा’चा मंत्र गावागावांत पोहोचावा म्हणून..राष्ट्रीय सहकार धोरण २०२५, एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य

चुरशीच्या लढतीत राहुल ढिकले यांचा विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 01:26 IST

नाशिक पूर्व विधाससभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अ‍ॅड. राहुल ढिकले यांनी राष्ट्रवादीचे बाळासाहेब सानप यांचा १२ हजार मतांनी पराभव केला आहे.

नाशिक : नाशिक पूर्व विधाससभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अ‍ॅड. राहुल ढिकले यांनी राष्ट्रवादीचे बाळासाहेब सानप यांचा १२ हजार मतांनी पराभव केला आहे. या निवडणुकीत अ‍ॅड.राहुल ढिकले यांना ८५ हजार २३२ मते मिळविली, तर बाळासाहेब सानप यांना १३ हजार २१९ मते मिळाली असून, या निवडणुकीतून नाशिक पूर्व मतदारसंघात पुन्हा एकदा ढिकले घराण्यातून आमदार निवडून आला आहे.नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातच्या मतमोजणीला सकाळी ८ वाजेच्या सुमारास सुरुवात होताच अ‍ॅड. राहुल ढिकले यांनी पहिल्या फेरीतच सुमारे ९३५ मतांची आघाडी घेतली. त्यानंतर ही आघाडी अशीच दुसऱ्या अणि तिसºया फेरीतही वाढत गेली. चौथ्या फेरीत सानप यांना २६६ मतांची आघाडी मिळाली. परंतु, त्यामुळे ढिकले यांची आघाडी कमी होऊ शकली नाही. त्यानंतर थेट सतराव्या फेरीपर्यंत राहुल ढिकले फेरीनिहाय आघाडी घेत राहिले. त्यामुळे त्यांना सराव्या फेरीअखेर ९ हजार ३८२ मतांची आघाडी मिळाली होती. मात्र अठराव्या फेरीमध्ये पुन्हा एकदा बाळासाहेब सानप यांनी ढिकलेंपेक्षा ३२० मते अधिक घेतली. त्यानंतर हा कल सुरू राहण्याच्या शक्यतेने विजयी आघाडी असतानाही अ‍ॅड. राहुल ढिकले यांनी कौल पूर्णपणे स्पष्ट होईपर्यंत प्रतीक्षा करण्याची भूमिका घेतल्याचे दिसून आले. मात्र हा मताधिक्क्याचा कल पुढे टिकला नाही. त्यामुळे ढिकले यांच्या विजयी आघाडीत वाढ होत गेल्याने विसाव्या फेरीचे मतदान सुक्रू असताना बाळासाहेब सानप यांनी अखेर पराभवाचे संकेत दिसू लागल्याने मतमोजणी सोडले. त्यानंतर एकविसावी फेरी सुरू झाल्यानंतर अ‍ॅड. ढिकले मतमोजणी केंद्रावर पोहोचल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. दरम्यान, काँग्रेसचे उमेदवार गणेश उन्हवणे यांच्यासह अपक्ष महेश आव्हाड यांनी मतमोजणी सुरू असताना यंत्रांवर उमेदवार प्रतिनिधींच्या स्वाक्षºया नसल्याने आक्षेप घेतल्यामुळे सुमारे दीड तास मतमोजणी खोळंबली होती.विजयाची तीन कारणे...1मनसेकडून उमेदवारी मिळण्याची चिन्ह असतानाही मतदारांचा कल ओळखून ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश करून सत्ताधारी पक्षाकडून निवडणूक लढवली.2नाशिक पूर्व मतदारसंघातून मनसेची उमेदवारी निश्चित असल्याने जवळपास दोन ते अडीच वर्षांपासून निवडणुकीची तयारी केली होती.3वडील उत्तमराव ढिकले नाशिकमधून खासदार आणि नाशिकपूर्वमधून आमदार राहिल्याने लाभलेला राजकीय वारसा.सानपांच्या पराभवाचे कारण...भाजपने तिकीट कापल्यानंतर ऐनवेळी राष्ट्रवादीत प्रवेश करून उमेदवारी मिळविली. मात्र काँग्रेसच्या उमेदवाराची माघार करवून आणण्यात अपयश आले. तसेच थेट मुख्यमंत्र्यांनी प्रचारातून केलेले भ्रष्टाचाराचे आरोप पराभवास कारणीभूत ठरले.पराभूत उमेदवार पक्ष मिळालेली मते२ अमोल पठाडे बसपा 00,843३ गणेश उन्हवणे कॉँग्रेस 4,452४ बाळासाहेब सानप राष्टÑवादी 74,304६ संतोष नाथ वंचित ब.आ. 10,051 ७ महेश आव्हाड अपक्ष 00,121८ नितीन गुणवंत अपक्ष 00,413९ भारती मोगल अपक्ष 00,375१० शरद बोडके अपक्ष 00,154११ सुभाष पाटील अपक्ष 00,217१२ संजय भुरकुड अपक्ष 00,357१३ वामन सांगळे अपक्ष 00,231

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nashik-east-acनाशिक पूर्वBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसResult Day Assembly Electionनिकाल दिवस विधानसभा निवडणूक