वायघोळ उपसरपंचपदी रघुनाथ पोटिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 00:29 IST2021-07-15T23:49:54+5:302021-07-16T00:29:48+5:30
वेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वायघोळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रघुनाथ पोटिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच पुष्पा सुरेश झोले यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतीची विशेष सभा घेण्यात आली होती.

वायघोळ उपसरपंचपदी रघुनाथ पोटिंदे
ठळक मुद्देप्रकाश राऊत यांचा कालावधी संपुष्टात आल्याने त्यांनी राजीनामा दिला होता.
वेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वायघोळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रघुनाथ पोटिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच पुष्पा सुरेश झोले यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतीची विशेष सभा घेण्यात आली होती.
या अगोदर सदस्यांत ठरलेल्या समझोत्याप्रमाणे पहिले अडीच वर्षे असलेला तत्कालीन उपसरपंच प्रकाश राऊत यांचा कालावधी संपुष्टात आल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे उपसरपंचपद रिक्त होते. या पदासाठी रघुनाथ पोटिंदे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच पुष्पा झोले, ग्रामसेवक जे.ऐ. कुमावत यांनी केली.