विजेच्या लपंडावाचा रब्बी पिकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 00:46 IST2020-02-24T00:07:50+5:302020-02-24T00:46:22+5:30
सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे गेल्या आठ दिवसांपासून वीज कंपनीच्या हलगर्जीपणामुळे अनियमित वीजपुरवठा होत असल्याने रब्बी पिकांना त्याचा फटका बसत आहे. शेतकऱ्यांना विहिरीत पुरेशा प्रमाणात पाणी असतानादेखील विजेच्या लपंडावाने पिके करपू लागली आहेत.

विजेच्या लपंडावाचा रब्बी पिकांना फटका
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे गेल्या आठ दिवसांपासून वीज कंपनीच्या हलगर्जीपणामुळे अनियमित वीजपुरवठा होत असल्याने रब्बी पिकांना त्याचा फटका बसत आहे. शेतकऱ्यांना विहिरीत पुरेशा प्रमाणात पाणी असतानादेखील विजेच्या लपंडावाने पिके करपू लागली आहेत.
महावितरणच्या नवीन वेळापत्रकानुसार शेतीसाठी आठ तास दिवसा वीजपुरवठा व आठ तास रात्री वीजपुरवठा करण्याचे ठरले आहे, परंतु ठाणगावला गेल्या तीन दिवसात एकही दिवस थ्री फेज वीजपुरवठा सुरळीत चाललेला नाही. त्यामुळे हातातोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास हिरावून घेऊ नये हीच शेतकरी बांधवांनी महावितरणकडून अपेक्षा व्यक्त केली आहे. शेतमालाला बाजार पेठेत दर नाही, निदान गव्हाचे पीक तरी सुटावे हीच अपेक्षा शेतकºयांना आहे.
लवकरात लवकर वीज मंडळानी याची दखल घ्यावी, अशी मागणी रामदास भोर, किरण बोºहाडे, सचिन रायजादे, धोंडीराम व्यवहारे, मनोज शिंदे, ज्ञानेश्वर भोर, किशोर शिंदे, सुभाष शिंदे, वसंत आव्हाड, राहुल काकड, शिंदे पाटील आदींसह शेतकºयांनी दिला आहे. ठाणगाव परिसरात गेल्या आठ दिवसांपासून विद्युत महावितरणचा भोंगळ कारभार सुरू असून, पाणी असूनही पिकास पाणी भरता येत नाही. उंबरदरी धरणामधून आवर्तन सोडण्यात आलेले आहे. शेतात गव्हाचे पीक अंतिम टप्प्यात असून, वेळेत पाणी मिळत नसल्याने पिके वाया जाण्याची भीती आहे. वीज उपकेंद्रात अथवा कर्मचाºयांना फोन केला की दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे सांगून वेळ मारून नेली जात आहे.