हवामान बदलाचा रब्बी पिकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 14:53 IST2020-01-25T14:52:52+5:302020-01-25T14:53:21+5:30
पाटोदा :येवला तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात वारंवार बदल होत असल्याने या हवामान बदलाचा रब्बी हंगामातील पिकांवर परिणाम होत असल्याने धोक्यात आली आहे.

हवामान बदलाचा रब्बी पिकांना फटका
पाटोदा :येवला तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात वारंवार बदल होत असल्याने या हवामान बदलाचा रब्बी हंगामातील पिकांवर परिणाम होत असल्याने धोक्यात आली आहे. शेतकर्यांना पिकांवर दिवसाआड औषध फवारणी करावी लागत असल्याने खर्चात वाढ झाली असल्याने शेतकरी वर्गाचे आर्थिक नियोजन कोलमडून पडले आहे.असून तो दुहेरी संकटात सापडला आहे.
तब्बल मिहनाभर चाललेल्या अवकाळी पावसाने येवला तालुक्यातील खरीपाची संपूर्ण वाताहत झाली तर द्राक्ष व डाळिंब बागाही गेल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले . असे असतानाही शेतकरी वर्गाने रब्बीसाठी पाणी उपलब्ध असल्याने .कांदा ,गहू, हरभरा,आदि पिकांची लागवड केली. खरीप नाही तर आता रब्बी पिकात उणीव भरून काढूया या आशेवर असणार्या शेतकर्यांची निसर्गाच्या लहरीपणा घोर निराशा केली.परिसरात तब्बल दोन अडीच मिहने ढगाळ वातावरण असून जोडीला दाट धुके, व दव आहेच त्यामुळे पिकांवर बुरशीजन्य किडी व रोगांचा फैलाव मोठया प्रमाणात होत असून पिकांच्या कोवळ्या भागास इजा पोहचत असल्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे रब्बीची पिके वाचिवण्यासाठी शेतकर्यांना पिकांवर दिवसाआड औषध फवारणी करावी लागत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ झाली आहे.
.................................
यंदा विहिरी कुपनलिका व बोअरवेल्सला मुबलक पाणी उपलब्ध असल्याने शेतकरी वर्गाने मोठया प्रमाणात रांगडा कांदा,उन्हाळ कांदा,गहू,हरभरा ,ज्वारी, या रब्बी पिकांची शेतात लागवड केली आहे.मात्र वातावरणातील या बदलामुळे गहू व कांदा पिकावर मावा तसेच अन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यंदा तालुक्यात कांदा लागवड क्षेत्रात तिप्पट वाढ झाली असून अजूनही लागवड सुरूच असल्याने क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.तसेच गव्हाची सुमारे सात हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे.तसेच हरभरा पिकावर घाट अळीच्या प्रादुर्भावामुळे हि पिके धोक्यात आली असल्याने पिके वाया जातात कि आशी धास्ती शेतकरी वर्गामध्ये निर्माण झाली आहे.
........................................
खरीप हंगामात शेतकरी वर्ग पूर्णपणे कर्ज बाजरी झालेला असून रब्बी हंगामही या निसर्गाच्या लहरीपणामुळे वाया जाण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होतो कि काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.